घरदेश-विदेशशशी थरुर अडचणीत, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस हायकोर्टात

शशी थरुर अडचणीत, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस हायकोर्टात

Subscribe

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, शशी थरुर यांना दिल्ली न्यायालायने नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार, याप्रकरणातील सुनावणी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी (Sunanda Pushkar Death Case) शशी थरुर यांना क्लिन चीट मिळाली होती. मात्र, या क्लिन चीटविरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) धाव घेतली आहे. याप्रकरणी आता ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : भाजपा उमेदवारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

- Advertisement -

पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शशी थरुर यांच्यावर लावण्यात आला होता. मात्र, सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येशी शशी थरुर यांचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देत पटियाला हाऊस कोर्टाने शशी थरुर यांना १८ ऑगस्ट २०२१ मध्ये क्लिन चीट दिली होती. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कोणतेही साहित्य सापडले नसल्याचं कारण देत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आता पटियाला हाऊसच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा – मुंबईत कोरियाच्या युट्यूबर तरुणीची छेडछाड; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, शशी थरुर यांना दिल्ली न्यायालायने नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार, याप्रकरणातील सुनावणी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

सुनंदा पुष्कर कोण?

सुनंदा पुष्कर यांचा जन्म १ जानेवारी १९६२ साली झाला होता. त्यांचे वडील पी.एन. दास हे भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी होते. श्रीनगरच्या गर्व्हमेंट कॉलेज फॉर वुमेनमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. शशी थरूर यांच्याशी त्यांचे तिसरे लग्न झाले. २०१० मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोची टीमच्या खरेदी प्रकरणात त्या अडकल्या होत्या. त्यामुळ त्यांची भागीदारी काढून घेण्यात आली होती. तेव्हाच त्यांनी शशी थरुर यांच्यासोबत असल्याच्या नात्याची कबुली देत २०१० मध्ये ते विवाहबद्ध झाले.

हेही वाचा -देशाचा गौरव : जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे, वर्षभरात 55 ठिकाणी 200 बैठका

दोघांमधील वाद काय?

२०१४ मध्ये शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्यातील वाद समोर आले होते. पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांचे शशी थरुर यांच्यासोबत काही संबंध असल्याचा संशय सुनंदा पुष्कर यांना आला होता. त्यानंतर शशी थरुर यांचं ट्विटर अकाऊंटही हॅक झालं होतं. या वादाची चर्चा संपूर्ण देशभर गाजली होती. मात्र, आमच्यात काहीच वाद नसल्याचं जाहीर निवेदन देऊन वादाला पूर्णविराम दिले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -