घरदेश-विदेशशशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे? २४ वर्षांनंतर आज ठरणार बिगर गांधी कुटुंबातील...

शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे? २४ वर्षांनंतर आज ठरणार बिगर गांधी कुटुंबातील काँग्रेसचा अध्यक्ष

Subscribe

हे मतदान गुप्त मतदान असल्याने कोणी कोणाला मतदान केलंय हे समजू शकणार नाही. आज सकाळी दहा वाजता सीलबंद मतपेट्या उमेदवाऱ्यांच्या एजंटसमोर उघडण्यात येतील. 

नवी दिल्ली – काँग्रेसला आज तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातून अध्यक्ष मिळणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीला ९६ टक्के मतदान झाले. आज मतदानाचा निकाल लागणार आहे. शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षपदाची लढत झाली होती. त्यामुळे कोणाच्या बाजूने कौल लागेल याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा उद्या ठरणार काँग्रेसचा अध्यक्ष; पण पक्षावर गांधी कुटुंबाचाच राहणार वरचष्मा

- Advertisement -

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानतंर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी माहिती दिली की सोमवारी झालेल्या मतदानात ९९०० पैकी ९५०० प्रतिनिधींनी मतदान केलंय. म्हणजेच जवळपास ९६ टक्के मतदान झालंय. हे मतदान गुप्त मतदान असल्याने कोणी कोणाला मतदान केलंय हे समजू शकणार नाही. आज सकाळी दहा वाजता सीलबंद मतपेट्या उमेदवाऱ्यांच्या एजंटसमोर उघडण्यात येतील.

मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्या दुहेरी लढत झाली. १३७ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात ही सहाव्यांदा निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या निवडणुकीत गांधी कुटुंबातील एकाही सदस्याला उमेदवारी देण्यात आली नव्हती. २४ वर्षांनंतर यंदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. राहुल गांधी मतदानावेळी बेल्लारीमध्ये होते. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी यांच्यासोबत इतर 50 मतदारांनी या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी १९३९, १९५०, १९७७, १९९७ आणि २००० मध्ये निवडणुका झाल्या आहेत. यावेळी तब्बल 24 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्यांनी सांगितले की, या निवडणुकीनंतर 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा नेता देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडला जाईल. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -