Homeदेश-विदेशShatrughan Sinha : मांसाहारावर कायमचीच बंदी आणा, शत्रुघ्न सिन्हा असे का म्हणाले?

Shatrughan Sinha : मांसाहारावर कायमचीच बंदी आणा, शत्रुघ्न सिन्हा असे का म्हणाले?

Subscribe

संसदेत समान नागरी कायद्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता काही राज्यांमध्ये ते लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तराखंडमध्ये हा कायदा सर्वात प्रथम लागू झाल्याने हे कायदा लागू करण्याचा प्रथम बहुमान या राज्याला मिळालेला आहे.

नवी दिल्ली : संसदेत समान नागरी कायद्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता काही राज्यांमध्ये ते लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तराखंडमध्ये हा कायदा सर्वात प्रथम लागू झाल्याने हे कायदा लागू करण्याचा प्रथम बहुमान या राज्याला मिळालेला आहे. अनेक विरोधकांनी मोदी सरकारच्या या कायद्याचे स्वागत केलेले आहे. पण दुसरीकडे या कायद्याचे स्वागत असल्याचे म्हणत याचा या कायद्याच्याअंतर्गत संपूर्ण देशात मांसाहार बंद करा, असे विधान तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. अभिनेता आणि आता खासदार पदावर असलेले शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. पण आता त्यांनी मांसाहाराबाबच मोठे विधान केले आहे.

संसदेच्या आवारातून तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी समान नागरी कायदा अर्थात UCC बाबत म्हणाले की, उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करणे कौतुकास्पद आहे. देशभरात समान नागरी कायदा लागू केला पाहिजे आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण माझ्या या मताशी सहमत असेल. मात्र त्यात काही त्रुटीसुद्धा आहेत. समस्या अशी आहे की, जे नियम उत्तर भारतात लागू केले जाऊ शकतात, ते ईशान्येकडील राज्यांमध्ये लागू केले जाऊ शकत नाहीत. युसीसीच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. (Shatrughan Sinha statement that non-veg should be banned in entire country)

हेही वाचा… Owaisi warning on waqf land : वक्फ मालमत्तेचा एक इंचही भाग सोडणार नाही; ओवैसींचा सरकारला इशारा

यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहाराबाबत विधान करत म्हटले की, देशातील अनेक भागांमध्ये गोमांसवर बंदी आहे. माझ्या मते देशभरात फक्त गोमांसच नाही तर संपूर्ण मांसाहारावर बंदी आणली गेली पाहिजे. मात्र ईशान्येतील राज्यांसह देशातील काही भागात अजूनही गोमांस खाल्ला जातो. माझे एक सहकारी आहेत, त्यांनी बरोबर म्हटले की, “वहाँ खाओ तो यम्मी, पर हमारे नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी.” पण असे केल्याने काही होणार नाही. ठराविक भागांमध्ये नाही तर सगळीकडे बंदी आणली पाहिजे. त्यामुळे सामन नागरी कायद्यात काही त्रुटी आहेत, काही पेच आहेत, ते बदलले गेले पाहिजे. म्हणजे, त्यानंतर येणाऱ्या अडचणी कमी होतीस, असे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.