घरदेश-विदेशपूनम सिन्हा यांचा सपामध्ये प्रवेश; लखनऊमधून लढणार

पूनम सिन्हा यांचा सपामध्ये प्रवेश; लखनऊमधून लढणार

Subscribe

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात पूनम लढत लढणार आहेत.

भाजपचे खासदार असणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर मंगळवारी १६ एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. पूनम सिन्हा यांनी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या सोबतचा फोटो ट्विट करत पूनम यांनी सामाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. तसेच पूनम यांना सपा-बसपा आणि युतीकडून लखनऊमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीमध्ये लढत रांगणार आहे.

- Advertisement -

लखनऊ हा भाजपचा बालेकिल्ला

लखनऊ हे देशातील सर्वात जास्त मतदार असणारा मतदारसंघापैकी एक आहे. लखनऊमध्ये चार लाख कायस्थ, साडेतीन लाख मुस्लीम आणि १.३ लाख सिंधी मतदार आहेत. पुनम सिन्हा या सिंधी आहेत तर त्यांचे पती शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ आहेत. त्यामुळे पुनम सिन्हा या रादनाथ सिंह यांच्यापुढे तगडे आव्हान असण्याची शक्यता आहे. तसेच येत्या १८ तारखेला पूनम सिंहा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून आजपर्यंत लखनऊमध्ये भाजपचा पराभव झाला नाही आहे. त्यामुळे पूनम यांच्या पूढेही मोठे आव्हान असणार आहे.

पूनम सिन्हा यांच्या बद्दल

पूनम सिन्हा या भारतीय अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल होत्या. त्यानंतर त्यांचे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबत विवाह केला. तसेच आता नुकतेच पूनम सिन्हा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -