घरताज्या घडामोडीकोरोना महामारीमध्ये शेजारधर्म पाळणारा भारत एक आदर्श देश - शेख हसीना

कोरोना महामारीमध्ये शेजारधर्म पाळणारा भारत एक आदर्श देश – शेख हसीना

Subscribe

कोरोना महामारीमध्ये औषधांचा पुरवठा केल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा भारताचे आभार मानले असून भारत हा चांगला शेजारी देश असल्याचा आदर्श हसीना यांनी म्हटलंय. कोरोनाच्या कठीण काळात भारताने आवश्यक पुढाकार घेत मदत केल्याबद्दल हसीना यांनी भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले आहे.

कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर भारताकडून शेजारील राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. यावेळी भारताकडून मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांना मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला होता. तसेच आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्ततादेखील करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जगातील अनेक देशांकडून भारताचे कौतुक करण्यात आले होते.

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना भारताने मध्यस्थी केली. तसेच भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत भारत सरकारकडून भारता व्यतिरिक्त इतर देशांतील नागरिकांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये बांग्लादेशातील नऊ नागरिकांचा समावेश होता. त्यावेळी सुद्धा शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात १३७ कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -