घरताज्या घडामोडीबापरे! समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील घटना

बापरे! समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील घटना

Subscribe

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी वैद्यकीय प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. आरोग्याची कमालीची काळजी घेतली जात असताना शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या कँटीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. डॉक्टर खात असलेल्या समोस्यात चक्क साबणाची वडी सापडल्याचे आढळून आले आहे.

नेमके काय घडले?

शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या कँटीनमध्ये डॉक्टर खात असलेल्या समोस्यात साबणाची वडी सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. समोसा खाताना भलतीच चव लागल्याने समोमाच्या आत पाहण्यात आले. त्यावेळी ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी कँटीनमधील जेवणात झुरळ सापडले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार; आयजीएमसीच्या कँटीनमध्ये डॉक्टरांचा एक ग्रुप समोसे खात बसला होता. तेथे त्यांना समोसा खाताना साबणाची चव लागली. समोसा उघडून पाहिला तर त्यात साबणाची अर्धी वडी दिसली. डॉक्टरांनी याची तक्रार आयजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेंट यांच्याकडे केली आहे. ही पहिली वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा जेवणात काहीतरी गडबड असल्याच्या घटना घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अनेकदा तक्रार करुनही काहीच परिणाम झाला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: रशियानंतर चीननं शोधली लस, आपत्कालीन स्थितीत लसीला मंजुरी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -