घरदेश-विदेशशिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

शिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

Subscribe

विधानसभेनंतर शिंदे गटात संसदेतील 12 खासदार सहभागी झाले आहेत. या शिंदे गटातील खासदारांनी शिवसेनेचे संसदेतील कार्यालया ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत एक पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. तर दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत गटनेतेपदावर शिंदे गटाने दावा केला आहे.

राज्यात विधानसभेत दोन तृतीयांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर लोकसभेमध्ये अशाच प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असल्यादा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेचे कार्यालय ताब्यात मिळावे असे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. दरम्यान संसदेत प्रत्येक पक्षाला कार्यालय देण्यात येते. शिवसेनेलाही संसदेत कार्यालय देण्यात आले आहे. हे कार्यालय ताब्याबत मिळावे, अशी मागणी शिंदे गाटने केली आहे.

- Advertisement -

शिंदे गटासोबत गेलेले आमदार –

राहुल शेवाळे

- Advertisement -

भावना गवळी

कृपाल तुमाने

श्रीकांत शिंदे

धैर्यशील माने

संजय मंडलिक

हेमंत गोडसे

सदाशिव लोखंडे

प्रतापराव जाधव

श्रीरंग बारणे

राजेंद्र गावीत

हेमंत पाटील

…तर कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात जाणार –

लोकसभा अध्यक्ष आधीचे गटनेचे विनायक राऊत यांनाच कायम ठेवतात की नवे गटनेते राहुल शेवाळे यांना मान्यता देतात यावर बरंच काही ठरणार आहे. जर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी मान्यता मिळाली तर शिवसेनेचे हे कार्यालयही शिंदे गटाच्या ताब्यात जाणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -