घरदेश-विदेशप्रदूषणापासून वाचण्याकरिता देवाने घातले मास्क!

प्रदूषणापासून वाचण्याकरिता देवाने घातले मास्क!

Subscribe

उत्तर भारतात वायू प्रदूषण वाढले असल्यामुळे लोक आरोग्याला धोका होवू नये म्हणून मास्क घालून फिरत आहेत. मात्र आता देवांनाही या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी मास्क घातले जात आहे.

सध्या उत्तर भारतात वायू प्रदूषण झाले असून दिल्लीत मोठ्या प्रमाणात झाले आहे. आता याच वायू प्रदूषणाची पातळी वाराणसीत वाढली आहे. या वायू प्रदूषणाचा आरोग्याला धोका होत असल्यामुळे मास्क लावले जातात. मात्र हाच मास्क तारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगला देखील घातला आहे. भगवान शंकर यांना वायू प्रदूषणापासून वाचविण्याकरिता हा मास्क शिवलिंगाला बांधला आहे. एएनआय या वृत्तसंस्थाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मंदिरा जवळील मास्क घातलेल्या पुजारी आणि भक्तांचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisement -

पूर्ण शहरात वायू प्रदूषण झाले आहे. या वायू प्रदूषणापासून ‘भोले बाबा’ यांना वाचविण्यासाठी आम्ही मास्क घातला आहे. जर ते सुरक्षित असतील तर आपण सुरक्षित राहू, असं एका भक्ताने सांगितलं आहे. सिग्र येथील शिव-पार्वती मंदिरात शिव, दुर्गा देवी आणि साईबाबा यांच्या मुर्तींना देखील मास्क लावले आहे. हे फोटो प्रिया जैन या व्यक्तीने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

- Advertisement -

तारकेश्वर महादेव मंदिरातील पुजारी हरीश मिश्रा असं म्हणाले की, ‘वाराणसी हे श्रद्धास्थान असून आम्ही देवांची मूर्तीं ही सजीव असल्याचं मानतो. म्हणून त्यांची आम्ही काळजी घेतो. उन्हाळ्यामध्ये आम्ही मूर्तींना थंड ठेवण्यासाठी चंदनाची पेस्ट लावतो. तर हिवाळ्यात आम्ही लोकरमध्ये मूर्तीला झाकतो. त्याचप्रकारे आम्ही आता मूर्तीचे वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क लावला आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -