आमदारांची समजूत काढण्यासाठी साताऱ्याचा हा पठ्या थेट आसाममध्ये

shivsena

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेने फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत 45 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत ते त्यांची साथ सोडून हळूहळू शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. अशातच शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी स्वतः शिवसेना कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

शिवसैनीक सातऱ्यातून गुवाहाटीत  –

एकनाथ शिंदे यांनी या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये ठेवले आहे. या आमदारांनी पुन्हा शिवसेनेत परतावे म्हणून एका शिवसैनिकाने साताऱ्याहून थेट गुवाहाटी गाठले आहे. संजय भोसले असे  त्या शिवसैनाकचे  नाव आहे. संजय भोसले हे शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आहेत. भोसले हे एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील मूळ गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा मुंबईत परतण्याचे आवाहन करण्यासाठी भोसले गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमबाहेर पोहोचले होते. ते आपल्यासोबत एक पोस्टर ही घेऊन गेले होते. ज्यावर लिहिले होत की, ”शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला.” मात्र, ते बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करण्याआधीच  त्यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांची शिंदेंवर टीका –

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्याकडे 15 हूनही कमी आमदारांचे पाठबळ राहिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला 250 हून अधिक पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, आपण ज्यांना मोठे केले त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही.’ शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना ठाकरे म्हणाले, स्वतःच्या मुलाला खासदार केले, मग माझ्या मुलाने काहीच करू नये का?