घरताज्या घडामोडीयामुळे कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल; शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले

यामुळे कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल; शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक.

‘दिवसागणिक पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे जनतेचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. पेट्रोल शंभरी पार गेले आहे. तर गॅस ८०० पार गेला आहे. त्यामुळे जनतेकडून कोहळा काढायचा आणि नंतर थोड्या दरकपातीचा आवळा जनतेच्या हातावर टेकवायचा असा प्रकार सुरु आहे’,असे म्हणत शिवसेनेने विरोधकांना लक्ष्य केले आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरावरुन आता शिवसेनेने मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

फुगे हवेत का सोडत आहात?

दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरवाढीबाबत विचारणा केली असता पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतील. याबाबत कोणताही अंदाज सांगता येत नाही, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. मग एकीकडे दर कधी कमी होणार याबाबत माहिती नसताना मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेलचे आणि गॅसचे दर कमी होतील, असे फुगे हवेत का सोडत आहात?, असा सवाल शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

इंधन आणि गॅसच्या वाढत्या दरावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून काही सवाल करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर मार्च-एप्रिलमध्ये कमी होतील’,असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी रविवारी म्हटले आणि सोमवारी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. त्यामुळे जनतेला शाब्दिक दिलासा देखील मिळू द्यायचा नाही’,असा पणच केंद्र सरकारने केला आहे का? मागील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर सुमारे १०० रुपयांनी वाढले. आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्यात पुन्हा २५ रुपयांची भर पडली. त्यामुळे दरवाढ नियंत्रणाचा हा कोणता प्रकार म्हणायचा?, असा सवाल उपस्थित केला आहे.


हेही वाचा – पीडित तरुणीसोबत लग्न करशील का? सुप्रीम कोर्टाने बलात्कारी आरोपीला विचारले

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -