पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट; शिवसेना खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला आहे.

‘भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट आहे’, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला आहे. सुशील मोदी यांनी ‘महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला’, असे वक्तव्य केले होते. (Shiv sena mp arvind sawant criticism of bjp mp sushil kumar modi)

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा खासदार सुशील मोदी यांच्यावर निशाणा साधला. “धोका देण्याचा पायंडा. ज्यांच्यामध्ये हा दुर्गुण आहे, तो भारतीय जनता पार्टीमध्ये मजबूतीने मुरला आहे. त्याचा मुरांबा झाला आहे. याबाबतची अनेक उदाहरणे आपण काश्मिर, हरियाणापासून नितीश कुमारांपर्यंत पाहिली”, अशी टीका सावंत यांनी केली.

पाठीत सुरा खुपसण्यात कोण एक्सपर्ट आहे? असा सवाल उपस्थित करत, मेहबुबा मुफ्ती यांच्यांच्यासोबत जाताना कोणाच्या पाठीत सुरा खुपसला, हिंदुत्वाच्या, 370च्या की काश्मिरमधील हिंदू बांधवांच्या पाठीत सुरा खुपसला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नितीश कुमार मोदी काय म्हणाले?

“महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता 2014, 2019 पेक्षाही अनेकपट जास्त आहे”, असे भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला आहे.

राज्यपाल फागू चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द

बिहारमध्ये जेडीयूने भाजपा साथ सोडून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळले आहे. महाराष्ट्रात भाजापाने सत्तांतर घडवून आणले, परंतु बिहारमध्ये मित्र पक्षानेच साथ सोडल्यामुळे सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले.


हेही वाचा – ‘फसवेगिरीची सवय’ असलेल्या नितीश कुमार यांचे राजकारण 2025ला संपेल; भाजपाची टीका