घरताज्या घडामोडीफिल्मसिटी संदर्भातील योगींच्या निर्णयाचे राऊतांनी केले स्वागत

फिल्मसिटी संदर्भातील योगींच्या निर्णयाचे राऊतांनी केले स्वागत

Subscribe

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यानाथ मुंबईतल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये १ हजार एकर क्षेत्रामध्ये मोठी फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. तसेच यामुळे मुंबईवरील ताण कमी होईल असे संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

‘जागातिक स्तरावर जे मुंबईचं महत्त्व आहे, त्याला कोणी नखही लावू शकत नाही. मुंबईच्या मदतीने जर देशाचा विकास होणार असेल, मागास राज्याचा विकास होणार असले तर त्यांनी जरूर करावे. मुंबई देशाचं पोट भरतंय. उत्तर प्रदेशचे लाखो लोकं मुंबईत पोट भरतायत. हे योगींना माहित आहे. त्यामुळे फिल्मसिटीमुळे उत्तर प्रदेश सारख्या मागस राज्याचा विकास होणार असेल, तिथे रोजगार निर्माण होणार असेल तर आम्ही योगींच्या निर्णयाचे स्वागत करतो. कारण यामुळे मुंबईचा ताण कमी होईल. यासंदर्भात योगींना जर काही मदत लागली तर यांसदर्भात तर आम्ही नक्की मदत करून आम्हाला काही अडचण नाही,’ संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

तसेच पुढे संजय राऊत म्हणाले की, ‘फक्त मुंबईतून आम्ही ते नेऊ, अमूक नेऊ, असे जर कोणी बोलत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. संपूर्ण देशाचा विकास व्हावा, पण दुर्देवाने सध्या तो थांबला आहे. उत्तर प्रदेशचा विकास सर्वात जास्त व्हायला हवा. कारण देशावर ताण आहे. त्यांची लोकसंख्या जास्त आहे, मागासले पण जास्त आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशची स्थिती काय आहे हे पाहायचे असेल, तर अलीकडे वेबसीरिज आली आहे ‘मिर्झापूर’ ती पाहा. जर ते सत्य असेल तर तिथे फिल्मसिटी नेऊ तिथे काय करणार आहे तुम्ही? हे बघा जरा.’


हेही वाचा – योगी आदित्यनाथांनी डाव टाकलाच; नोएडामध्ये हजार एकरच्या फिल्मसिटीची घोषणा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -