Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बेळगावात शिवसैनिक- कर्नाटक पोलीस आमनेसामने

बेळगावात शिवसैनिक- कर्नाटक पोलीस आमनेसामने

शिवसैनिक कर्नाटक शिनोळी गावात भगवा फडकवल्याशिवाय मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम

Related Story

- Advertisement -

बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झाला. याचपार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिक आज कर्नाटक सीमेवर दाखल होत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमेवरील पोहचत कर्नाटकमध्ये ‘भगवा फडकवल्याशिवाय मागे हटणार नाही’ अशा ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.  कोल्हापुरातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा ध्वज बेळगाव महापालिकेसमोर लावला. यानंतर  शिवसेनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असून त्यांचे कर्नाटक सीमेवर तीव्र आंदोलन सुरु आहे. दरम्यान आंदोलक शिवसेना कार्यकर्त्यांना पांगवताना कर्नाटक पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरु झाली.

यापार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर आता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र बेळगावमध्ये भगवा फडकवण्यावर शिवसेना ठाम असल्याने याभागात वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मोर्चाच्या पार्श्वभूमी प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच दिला जातोय पुढे प्रवेश दिला जात आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने बेळगावमधील मराठी भाषिकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूरातील शिवसैनिक आंदोलन करण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून बेळगावमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisement -