घरताज्या घडामोडीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत शिवभक्त, कांदा-लसूणही वर्ज्य

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत शिवभक्त, कांदा-लसूणही वर्ज्य

Subscribe

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपदीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी मुर्मूंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. एक नगरसेवक ते राष्ट्रपती असा प्रवास केलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधी सोहळ्यात आपला जीवन प्रवास आणि संघर्ष भाषणाच्या माध्यमातून सांगितला.

साधे आणि सरळ जीवन जगणाऱ्या द्रौपदी मुर्मूंचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच प्रेरणादायी आहे. अत्यंत साधेपणाने जगणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पूर्ण शाकाहारी आहेत. शिवभक्त असलेल्या मुर्मू या कांदा-लसूणही खात नाहीत. त्यांना राज्यातील पारंपारिक खाद्यपदार्थ असलेले पखाल आणि सजना खाण्यास आवडतं.

- Advertisement -

श्रावणच्या पहिल्याच सोमवारी मतदान आणि दुसऱ्या सोमवारी शपथविधी

ओडिशातील रायरंगपूर येथील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकित केल्यानंतर मंदिरात झाडू मारतानाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान श्रावणच्या पहिल्याच सोमवारी झाले आणि आता दुसऱ्या सोमवारी शपथविधी सोहळा पार पडला. शिवबाबांच्या ध्याना व्यतिरिक्त मुर्मू सर्व काही सोडू शकतात. त्यांची नात सुनिता मांझीने सांगितले की, त्या पहाटे ३-४ वाजताच्या सुमारास उठतात. त्यानंतर मॉर्निंग वॉक, योग आणि शिवपूजा करतात.

- Advertisement -

देशाचे नवे राष्ट्रपती काय खातात?

द्रौपदींची वहिनी शाक्य मुनी यांनी सांगितलं की, त्या शाकाहारी आहेत. सकाळी घरी जे काही तयार केले जाते. ते त्या नाश्ता म्हणून खातात. काही ड्रायफ्रूट्स त्यांच्या नाश्त्यात नक्कीच असतात. दुपारच्या जेवणात भात, भाजी, चपाती खातात आणि रात्री थोडी फळं आणि हळदीचं दूध पितात.

मुलाच्या मृत्यूनंतर आध्यात्मिक आधार

२०१३मध्ये आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी अध्यात्मचा मार्ग निवडला आणि त्या शिवभक्त बनल्या. एवढंच नाही तर त्यांनी मांसाहारही सोडला. आता त्या लसूण-कांदाही खात नाहीत. त्यांना पखाल आणि सजनाचं साग खायला खूप आवडतं. पखाल म्हणजे पाण्याचा भात आणि सजना म्हणजे हिरव्या भाज्या. अनेक राज्यांमध्ये याला मुनगाचे साग असेही म्हणतात.

दरम्यान, मुर्मू यांंनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मूळ गावात जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक विद्यार्थी आणि येथील लोकांनी आनंद साजरा केला.


हेही वाचा : हवाई दलात अग्निवीरांसाठी ३५०० जागा, केंद्र सरकारची संसदेत माहिती

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -