घरदेश-विदेशअमेरिकेत चोरीला गेलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सापडला, पण...

अमेरिकेत चोरीला गेलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सापडला, पण…

Subscribe

सन जोस् यांच्या पुणे येथील बहिणीने १९९९ साली हा पुतळा भेट दिला होता. गुआडालुपे नदी उद्यान (Guadalupe River Park) येथे हा पुतळा बसवण्यात आला होता. ३१ जानेवारी २०२३ रोजी हा पुतळा चोरीला गेल्याचे वृत्त तेथीलच एका वर्तमानपत्राने दिली होती. 

 

नवी दिल्लीः (shivaji maharaj statue) उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सन जोस शहातील एका उद्यानातून चोरीला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भंगारात सापडला आहे. अवैध कामांसाठी तेथील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हा पुतळा चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे. हा पुतळा येथे आणला तेव्हाही चोरीला गेला होता. नंतर तो सापडला.

- Advertisement -

सन जोस् यांच्या पुणे येथील बहिणीने १९९९ साली हा पुतळा भेट दिला होता. गुआडालुपे नदी उद्यान (Guadalupe River Park) येथे हा पुतळा बसवण्यात आला होता. ३१ जानेवारी २०२३ रोजी हा पुतळा चोरीला गेल्याचे वृत्त तेथीलच एका वर्तमानपत्राने दिले होते.

अवैध कामांसाठी हे भंगाराचे ठिकाण प्रसिद्ध आहे. तेथे ९ फेब्रुवारीला नऊ मुर्त्या सापडल्या. या मुर्त्या सुमारे २०० किलोच्या आहेत. या मुर्त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. भंगाराच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या मुर्त्या त्या ठिकाणी कशा आल्या याची अधिक माहिती त्या कामगारांनी दिली नाही. मात्र एक महिला व दोन पुरुष या मुर्त्या २९ जानेवारीला येथे ठेवून गेले, असे त्या कामगारांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.

- Advertisement -

सेन जोस पुणे सिस्टर संस्थेचे अध्यक्ष सुनिल केळकर यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा पुतळा सापडला त्याचा आनंद आहे. या पुतळ्याची पुर्नस्थापना करणे कठीण आहे. कारण पुतळ्याचा काही भाग भग्न अवस्थेत आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सापडला याचे समाधान आहे. हा पुतळा आता पुन्हा आहे त्या ठिकणी बसवून नागरिकांना तो बघतला येईल, असे सन जोस आंतरराष्ट्रीय घडामोडी व्यवस्थापक जो हेडस् यांनी सांगितले.

सन जोस शहराचे महापौर मथ महन यांनी सांगितले की, शिवाजी महाराज यांचा पुतळा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचे शौर्य व आमचे पुण्यासोबत असलेल्या संबंधांचे हा पुतळा प्रतिक आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -