घरदेश-विदेशशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतली पीडित काश्मिरी पंडितांची भेट

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतली पीडित काश्मिरी पंडितांची भेट

Subscribe

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी पीडित काश्मिरी पंडितांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काश्मिरी पंडितांना सुरक्षा मिळावी याकरता मागणी करणार असल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच राहुल भट या ३५ वर्षीय तरुणाचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. या मृत तरुणाच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी काश्मिरी पंडितांना सुरक्षा मिळावी याकरता मागणी करणार असल्याचे सांगितले. (Shivsena MP Priyanka Chaturvedi met Kashmiri Pandit)

विशेष रोजगार पॅकेज योजनेत क्लर्कची नोकरी करणारे राहुल भट यांची १२ मे रोजी हत्या करण्यात आली. बडगाम जिल्ह्यातील चदुरा येथील तहसील कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. गोळ्या झाडून अनेक काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारण्यात आलं. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेनेनेही आवाज उठवला.

- Advertisement -


शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल भट यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांच्या पाठिशी शिवसेना उभी राहिल असं सांगितलं. तसंच, काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

दरम्यान, या भेटीची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही माध्यमांना दिली आहे. शिवसेना काश्मिरी पंडितांच्या पाठिशी उभी आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -