घरदेश-विदेशदिल्लीत भेटींचा सिलसिला सुरुच; राऊत पवारांच्या घरी, दोघेही एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींकडे

दिल्लीत भेटींचा सिलसिला सुरुच; राऊत पवारांच्या घरी, दोघेही एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींकडे

Subscribe

देशाची राजधानी दिल्लीत राजकीय भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घएतली. त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीतून उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी रवाना झाले. १९ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय नेत्यांचा वावर वाढला असून भेटीगाठी सुरु आहेत. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची पीडा लागली आहे. तसंच, केंद्र सरकारने नव्याने सहकार खातं निर्माण केल्याने राज्यात राष्ट्रवादीच्या अडचणी वाढू शकतात, अशा चर्चा आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पवार-मोदी भेट खूप महत्त्वाची आहे.

- Advertisement -

शरद पवारांचं मोदींना पत्र

सहकार क्षेत्रांतील बदलामुळे सहकारी बँकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या, सहकारासंबंधी कायद्यांसंबधी बदलांबाबतचे आक्षेप यासंबंधी निवेदन शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. सहकार आणि बँकिंग कायद्यातील सुधारणांचं स्वागत आहे. पण अधिनियमातील मूलभूत तरतुदींमध्ये काही विसंगती आहेत. जे विशेषत: ९७ व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकारी तत्त्वांमध्ये आढळतात. सुधारित कायद्याची उद्दीष्टे चांगल्या हेतूने आहेत. त्यातील बर्‍याच तरतुदी आवश्यक आहेत. बोर्ड आणि व्यवस्थापन निश्चितपणे कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि ठेवीदारांचे हित संरक्षित केले पाहिजे. परंतु त्याच वेळी हे सुनिश्चित केले पाहिजे की असे करताना घटनेत नमूद केलेल्या सहकारी तत्त्वांचा बळी दिला जाऊ नये, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -