घरताज्या घडामोडीशिवसेना यूपीत पहिल्या टप्प्यात 'या' १२ जागांवर उमेदवार देणार, संजय राऊतांची घोषणा

शिवसेना यूपीत पहिल्या टप्प्यात ‘या’ १२ जागांवर उमेदवार देणार, संजय राऊतांची घोषणा

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात १२ जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. १२ जागांवरील उमेदवारांची नावे अद्याप घोषित करण्यात आली नाही.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी विरोधकांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी विरोधक एकजूट झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिल्या टप्प्यात १२ जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. युपीमध्ये भाजपला विरोधकांनी तगडे आव्हान दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आप आणि शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विरोधकांमधील बडे नेते प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौरा करणार असल्याचेही समजते आहे. शिवसेनेकडून उत्तर प्रदेश पश्चिमेकडील १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात १२ जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. १२ जागांवरील उमेदवारांची नावे अद्याप घोषित करण्यात आली नाही. केवळ १२ जागांची नावे संजय राऊत यांनी सांगितली आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये खतौली, मेरठ कैंट, धौलाना, नोएडा, दादरी, सिकंदराबाद, अनूपशहर, डिबाई, मांट, मथुरा, खैरागढ आणि दक्षिण आगरा येथे उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना राऊतांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

युपीत विरोधी पक्षातील प्रमुख नेते जाणार

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी विरोधकांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख आणि बडे नेते उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे युवानेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेस नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दल आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन असे प्रमुख नेते भाजपविरोधात प्रचार करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत.

- Advertisement -

गोव्यात उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवारी मागे घेणार 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील उमदेवारांची नावे जाहीर केली आहेत. पणजी मतदारसंघातून शैलेंद्र वेलींगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या मतदारसंघात उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवारी लढवली तर उमेदवार मागे घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्पल पर्रिकरांनी पणजीतून अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता शैलेंद्र वेलींगकर यांची उमेदवारी मागे घेणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -