घरदेश-विदेशशोएब अख्तरचा पाकिस्तानी क्रिकेट संघाबाबत धक्कादायक गौप्यस्फोट!

शोएब अख्तरचा पाकिस्तानी क्रिकेट संघाबाबत धक्कादायक गौप्यस्फोट!

Subscribe

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेट संघाबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आणि रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला शोएब अख्तर हा त्याच्या निवृत्तीनंतर कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. विशेषत: तो करत असलेल्या विधानावरून अनेकदा वाद देखील निर्माण झाले आहेत. असंच एक वक्तव्य शोएब अख्तरनं केलं आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत शोएब अख्तरनं केलेल्या या वक्तव्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषत: सध्या भारतात सुरू असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे तर या वादात जास्तच भर पडली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात असलेल्या हिंदू खेळाडूसंदर्भात एका टीव्ही शोमध्ये बोलताना शोएब अख्तरनं हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर?

एका टीव्ही शोमध्ये सुरू असलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना शोएब म्हणाला, ‘पाकिस्तानच्या क्रिकेट संघामध्ये हिंदू खेळाडूंविषयी सापत्न वागणूक दिली जात होती. संघात गुणवत्ता किंवा कामगिरी याच्यापेक्षाही इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या टीममध्ये हिंदू खेळाडू होता. पण त्याच्यावर अन्याय झाला. पाकिस्तान संघाच्या अनेक विजयांमध्ये दानिश कनेरियाचा महत्वाचा वाटा होता. पण त्याला साधं सोबत जेवताना देखील अनेक पाकिस्तानी खेळाडूंना ते रुचायचं नाही. म्हणून त्याने लवकर निवृत्ती घेतली’.

- Advertisement -

शोएब अख्तरच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या या वक्तव्यावरून अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -