घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्रीपद स्वीकारण्यापुर्वीच शोभा करंदलाजेंनी डिलीट केले जुने ट्विट

केंद्रीय मंत्रीपद स्वीकारण्यापुर्वीच शोभा करंदलाजेंनी डिलीट केले जुने ट्विट

Subscribe

मंत्री बनन्यापुर्विच ट्विट डिलीट केले आहेत त्यांनी अधिक ट्विट हे आतंकवदा, लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन सारख्या अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर केले होते.

केंद्रीय कृषि राज्यमंत्री शोभा करंदलाजे या कर्नाटकमधील आक्रमक नेत्यांपैकी एक आहेत. शोभा करंदलाजे या उडुपी-चिकमंगलुरुमधील भाजप खासदार आहेत. करंदलाजे मागील काही काळापासून गाय तस्करी आणि लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांवरुन भाष्य करत निषेध करतायत. तसेच सीएए-एनआरसी कायद्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता आणि जोरादर निदर्शनंही केली होती. विरोधादरम्यान शोभा करंदलाजे यांनी बरेच ट्विट केले होते ते मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. परंतु शोभा करंदलाजे यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीपुर्वी सर्व ट्विट डिलीट केले असल्यामुळे चर्चेचा विषय झाल्या आहेत.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी पदभार स्वीकारण्याच्या काही तासांपुर्वीच ट्विटर टाइमलाइन डिलीट केली आहे. सध्या त्यांच्या ट्विटरवर मोजकेच ट्विट शिल्लक राहिले आहेत. करंदलाजे यांचे ट्विटर अकाऊंट ११ वर्ष जुने आहे. करंदलाजे संघ परिवाराशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांच्या विश्वासपात्र मानल्या जातता. परंतु मंत्री बनन्यापुर्विच ट्विट डिलीट केले आहेत त्यांनी अधिक ट्विट हे आतंकवदा, लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन सारख्या अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर केले होते.

- Advertisement -

बनावट व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे ट्रोल

काही महिन्यांपुर्वी शोभा करंदलाजे यांनी बनावट व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या होत्या अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. ट्रोल होऊन देखील करंदलाजे यांनी आपले ट्विट डिलीट केले नव्हते.

सीएए बाबत ट्विटमुळे झाली होती तक्रार

जानेवारी महिन्यामध्ये केरळ पोलिसांनी भाजप खासदार शोभा करंदलाजे यांच्यावर एका वादग्रस्त ट्विटमुळे तक्रार दाखल केली होती. शोभा करंदलाजे यांनी ट्विट केलं होते की, केरळमधील मल्लपुरम येथे नागरिकत्व सुधारक कायदा (सीएए) समर्थक हिंदुंच्या घरचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ट्विटमुळे केरळ पोलिसांनी शोभार करंदलाजे याच्याविरोधात आयपीसी १५३ए, १२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

केरळची परिस्थिती कश्मीरसारखी

शोभा करंदलाजे यांनी आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, केरळची परिस्थिती हळू हळू कश्मीर सारखी व्हायला लागली आहे. मलप्पुरमच्या कुट्टीपुरम पंचायतीतील सीएए समर्थक हिंदुंच्या घरचा पाणीपुरवठा रोखण्यात आला आहे. सेवा भारती संस्था या हिंदुंना पाणी पुरवठा करत आहे. प्रसार माध्यमे या शांतीदुतांची हिंसकता आणि असहिष्णुता दाखवणार का? या ट्विटचा अनेक नेटकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला असल्याचे म्हटलंय तर काही नेटकऱ्यांनी या ट्विटचा निषेध केला होता. यावेळीही वाद होऊन शोभा करंदलाजे यांनी ट्विट डिलीट केले नव्हते.

एफआयआर दाखल केल्यावरही केलं होतं ट्विट

शोभा करंदलांजे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतरही त्यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. केरळ कुन्नूमधील दलित कुंटुंबांमधईल भेदभावावर कारवाई करण्याऐवजी केरळ सरकारने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपण सर्वांनी केरळमधील भेदभाववादी डाव्या सरकारच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएए मंजूर झाला. पण ज्यांचे समर्थन आहे त्यांच्यासोबत राज्यात भेदभाव केला जात आहे. त्यांच्या नोकऱ्याही गमावल्या जात आहेत यावर केरळ सरकार शांत का बसली आहे असा सवाल शोभा कंरदलाजे यांनी केला आहे. हे ट्विट देखील करंदलाजे यांनी डिलीट केले नव्हते परंतु केंद्रीय मंत्रिपदापुर्वी सर्व ट्विट डिलीट केल्यामुळे चर्चांना उधाण आल आहे.

आत्महत्येला सांगितले हत्या

शोभा करंदलाजे यांनी २६ मे २०१९ रोजी ट्विट केले होते. बेळगावमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय शीवु उप्पर याची गाय तस्करांनी (गौ-तस्कर) हत्या करुन त्याचा मृतदेह बस स्टॉपमध्ये लटकवण्यात आला आहे. शोभा म्हणाल्या की, शीवुची चुक एवढीच होती की त्याने गौ तस्करांपासून गाय वाचवण्याचा प्रयत्न केला होता. या ट्विटचे ऑल्ट न्यूजने फॅक्ट चेक केलं होते यामध्ये पोलिसांचा तपास आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये असे आढळले की, शीवु ने आत्महत्या केली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -