घरदेश-विदेशधक्कादायक : H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात 2 मृत्यू; 90 प्रकरणे समोर

धक्कादायक : H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात 2 मृत्यू; 90 प्रकरणे समोर

Subscribe

नवी दिल्ली : देशात कोविडसारख्या महामारीनंतर आता H3N2 इन्फ्लूएंझा आजाराचे प्रमाण वाढले असून या आजारामुळे देशात पहिल्यांदाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून दावा करण्यात आला आहे की, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएन्झाच्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात H3N2 चे 90 रुग्ण आढळून आले आहेत.

हरियाणामध्ये इन्फ्लूएन्झामुळे मृत्यू झालेल्या माहीतीला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, कर्नाटकमध्ये इन्फ्लूएन्झामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहीती मिळाली आहे. हिरा गौडा असे मृत रुग्णाचे नाव असून ते ८२ वर्षांचे होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरा यांचा मृत्यू १ मार्च रोजी झाला असून त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तपासादरम्यान त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्याची तपासणी केली असता त्यांना H3N2 ची लागण झाल्याचे 6 मार्च रोजी समजले.

- Advertisement -

वयस्कर लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लोकांना H3N2 इन्फ्लूएंझापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा हा आजार कोरोनासारखा पसरतो, असेही ते म्हणाले. या आजारापासून वाचण्यासाठी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात वारंवार धुणे गरजेचे आहे. वृद्ध आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना या आजाराची लागण जास्त होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

राजस्थानमध्ये H3N2 इन्फ्लूएंझामध्ये वाढ
राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसात H3N2 ची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बहुतेक मुल H3N2 इन्फ्लूएंझाच्या विळख्यात असून त्यांना बरे होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच मुलांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या चौथ्या रुग्णांला जास्त ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत. H3N2 इन्फ्लूएंझा हा विषाणू हवामानातील बदलामुळे सक्रिय होतो आणि वेगाने पसरतो. H3N2 इन्फ्लूएंझामुळे येणारा ताप हा साधारणत: ३-४ दिवस राहतो, परंतु काही प्रकरणांमध्ये ६-७ दिवसांतही ताप बरा होत नाही.

- Advertisement -

H3N2 इन्फ्लूएंझापासून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग गरजेचे
देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएन्झाबाबत लोकांना सावध राहण्याचे आवाहन एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा कोरोनासारखा पसरतो. यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा. वृद्ध आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना या आजाराची लवकर लागण होऊ शकते.

कोरोना रुग्णांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. 67 दिवसांनंतर कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3 हजारांहून अधिक झाले आहेत. कोरोना रुग्णांबरोबरच H3N2 इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्येही वाढ झाली होत आहे, जे चिंताजनक आहे.

होळीनंतर H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यात
उत्तर भारतात H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांची संख्या वाढत आहे. ICMR नुसार, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. निरीक्षण डेटा सूचित करते की, 15 डिसेंबरपासून H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -