घरताज्या घडामोडीपीएम मोदींच्या मतदारसंघात ध्वजारोहणानंतर घडला धक्कदायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल...

पीएम मोदींच्या मतदारसंघात ध्वजारोहणानंतर घडला धक्कदायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल…

Subscribe

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात देशातील नागरिकांनी तिरंगा घरावर लावून त्यांचा सहभाग नोंदवला. तसेच सार्वजनिक ठिकाण मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण करण्यात आले. देशभरात सातंत्र्य दिनाची ७५ वर्ष जल्लोषात साजरा होत असताना पीएम मोदींच्या मतदारसंघात ध्वजारोहणानंतर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार वाराणसीत घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाराणसीतील आयआयटी (बीएचयु) येथे ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. परंतु पाहुणे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट आयटम साँन्गवर डान्स सुरू केला. ज्यांनी ‘मा तुझे सलाम’वर घोषणा दिल्या होत्या, त्यांनी नंतर भोजपुरी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरला.

- Advertisement -

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओनुसार यामध्ये ध्वजारोहण केल्यानंतर येथील सर्व विद्यार्थी हे हिंदी चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा प्रकार सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या प्रध्यापक आणि अन्य लोकांनी याला विरोध केला. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवारी संस्थेचे डायरेक्टर प्रमोद कुमार यांनी संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारा संबंधित चौकशी सुरू असून पोलीस काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : २०२४ च्या निवडणुकीनंतर भाजप भारतीय राज्यघटनाच बरखास्त करेल, मुफ्तींचा गंभीर आरोप

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -