घरताज्या घडामोडीविमानात प्रवासी अश्लील फोटो पाठवत असल्याने वैमानिकाचा संताप, केलं असं काही...

विमानात प्रवासी अश्लील फोटो पाठवत असल्याने वैमानिकाचा संताप, केलं असं काही…

Subscribe

एअरड्रॉपच्या माध्यमातून काही प्रवाशांनी पायलटला अश्लील फोटो पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेत साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या पायलटसोबत हा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकाराचा राग आल्याने पायलटने उड्डाण रद्द करण्यासह प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्याची धमकी दिली.

एअरड्रॉपच्या माध्यमातून काही प्रवाशांनी पायलटला अश्लील फोटो पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेत साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या पायलटसोबत हा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकाराचा राग आल्याने पायलटने उड्डाण रद्द करण्यासह प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्याची धमकी दिली.

इंटरकॉमवर इशारा देताना पायलटच्या आवाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्युस्टनचे विल्यम पी. विमानतळ ते मॅक्सिकोचे काबो सान लुकासचे विमानतळ यादरम्यानच्या उड्डाणावेळी काही प्रवाशांनी पायलटला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

त्यानंतर, पायलटने इंटरकॉमवर असे न करण्याचा इशारा दिला. तसेच, अश्लील फोटो पाठवणे थांबवले नाही तर मॅक्सिकोला जाणारे विमान थांबवण्यात येणार असल्याचे पायलटने सांगितले. तसेच, “जर प्रवाशांनी फोटो पाठवणे थांबवले नाही तर विमान लँड करावे लागेल. आम्हाला सुरक्षा व्यवस्थेला पाचारण करणे भाग पडेल, असे केल्याने तुमच्या सुट्यांचा खोळंबा होऊ शकतो”, असे संतापलेल्या पायलटने म्हटले.

प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला टीमकडून सर्वोच्च प्राधान्य असल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सतत्या पडताळता येत नसल्याचे एअरलाइन्सच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, एअरड्रॉपच्या माध्यमातून आयफोन युजर्स सेल्युलर डाटा किंवा वाय-फायचा वापर न करता अॅपल युजर्सना डिजिटल फाइल पाठवू शकतात. साऊथवेस्ट एअरलाइन्समध्येही असाच प्रकार घडला.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तानातील हेरात मशीद परिसरात बॉम्बस्फोट; 14 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -