नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री 8 वाजता दूरदर्शनवर येत घोषणा केली की, आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली जात आहे आणि यापुढे त्या चलनातून बाद होणार आहेत. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याची घोषणा केली होती. आज 8 नोव्हेंबर 2023 रोजी देशात नोटाबंदीला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी मोदींनी मला केवळ 50 दिवस द्या, 50 दिवसांत देश भ्रष्टाचारमुक्त झाला नाही, तर मला जिवंत जाळा, असेही वक्तव्य केले होते. परंतु, त्यानंतर त्यांच्या वक्तव्याबाबत कुठेही चर्चा करण्यात आली नाही. मात्र, आज सुप्रीम कोर्टाच्या एका ज्येष्ठ वकिलाने याबाबतची पोस्ट करत मोदींच्या त्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. (Shocking statement of Supreme Court lawyers about Prime Minister Narendra Modi)
हेही वाचा – LIC सोबत करार; रेल्वेच्या 31 हजार 466 कर्मचाऱ्यांना मिळणार विमा कवच
सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी याबाबतची पोस्ट त्यांच्या X या सोशल मीडिया अकांउटवरून केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. “नोटबंदीची 7 वर्षे. त्यांनी (नरेंद्र मोदी) 50 दिवसांची मुदत मागितली होती. पण आता त्यांना आणि भाजपाला गाडण्याची वेळ आली आहे.” असे लिहित प्रशांत भूषण यांनी “मला 50 दिवस द्या, मी चुकीचा निघालो, तर मला जाळून टाका” असा मथळा असलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी त्यांच्या या पोस्टमधून मोदींवर सडकून टीका केली आहे.
7 years from Demonetisation today. He asked for 50 days. Time to bury him & the BJP pic.twitter.com/kjsWNcl3QS
— Prashant Bhushan (@pbhushan1) November 8, 2023
प्रशांत भूषण हे इतक्यावरच थांबले नाही. तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे निराश झालेल्या लोकांची मोदींनी कशी खिल्ली उडवली, हे कधीही विसरू नका, असा सल्ला त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत दिला आहे. “नोटाबंदीमुळे लोकांना निराश करून मोदींनी त्यांची खिल्ली कशी उडवली, हे कधीही विसरू नका. तुम्हाला हे पण माहीत आहे, 8 तारखेला रात्री 8 वाजता अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या. घरी लग्न आहे, पण पैसे नाहीत, अशी लोकांची स्थिती होती. मोदींचे हे वक्तव्य ऐकून भक्त (नरेंद्र मोदी समर्थक) हसत होते.” असे म्हणत वकील प्रशांत भूषण यांनी मोदींच्या वक्तव्यावर निशाणा साधला.
कभी मत भूलिएगा किस तरह मोदी जी ने नोटबंदी करके, जनता को हताश करके, उनका मजाक उड़ाया!
“आपको भी पता है कि 8 तारीख के रात को 8:00 बजे अचानक 500 और 1000 के नोट खत्म कर दिए मैंने। घर में शादी है, पैसे नहीं है”!
और इस पर उनके भक्त हंस रहे थे! pic.twitter.com/isexu0nLYB— Prashant Bhushan (@pbhushan1) November 8, 2023