धक्कादायक : झारखंडमध्ये भीषण अपघात ; बस-ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार

या भीषण अपघातात 10 जणांची मृत्यू झाला आहे,तर अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्यापही मृतांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.या मृतांमध्ये बहुतांश बस प्रवाश्यांचा समावेश आहे.

Shocking: Terrible accident in Jharkhand; 10 killed on bus-truck collision
धक्कादायक : झारखंडमध्ये भीषण अपघात ; बस-ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार

झारखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात झाला असून, अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाकूर जिल्ह्यातील रस्त्यावर बस आणि ट्रकमध्ये धडक झाली आहे. लिट्टीपाडा – आमदापारा मुख्य रस्त्यावर पडेरकोलाजवळ मंगळवारी सकाळी हा अपघात झाला आहे. कृष्णा रजत बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळत आहे. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाडयांची जागीच चक्काचूर झाला. या मृतांमध्ये बहुतांश बस प्रवाश्यांचा समावेश आहे.

या भीषण अपघातात 10 जणांची मृत्यू झाला आहे,तर अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्यापही मृतांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. या अपघातात अजूनही काही लोकांचा बळी गेला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाकूर जिल्ह्यातील स्थानिकांनी आपल्यापरिने बचावकार्य सुरु केले.या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.


हेही वाचा – महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य भोवलं; कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांकडून अटक