घरदेश-विदेशब्राझीलमध्ये अल्पवयीन आरोपीकडून शाळांमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, 11 जखमी

ब्राझीलमध्ये अल्पवयीन आरोपीकडून शाळांमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, 11 जखमी

Subscribe

ब्राझीलमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. दक्षिणपूर्व ब्राझीलमधील दोन शाळांमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात दोन शिक्षकांसह एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 11 जखमी झाले आहेत. हातात सेमीऑटोमॅटिक पिस्तूल आणि बुलेटप्रूफ व्हेट परिधान केलेल्या शूटरने एस्पिरिटो सॅंटो (Espirito Santo) राज्यातील अराक्रूझमधील दोन शाळांमध्ये हा गोळीबार केला. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता ही घटना घडली.

एस्पिरिटो सॅंटोचे सार्वजनिक सुरक्षा प्रमुख, मार्सिओ सेलांटे यांच्या माहितीनुसार, गोळीबार करणारा आरोपी 16 वर्षांचा मुलगा असून त्याने चेहरा झाकून घेतला होता, त्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण होते. मात्र त्याला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर हा लष्करी कपड्यात होता आणि त्याने एका खाजगी आणि सार्वजनिक शाळेत गोळीबार केला.सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये हल्लेखोर बुलेटप्रूफ वेस्ट घातलेला आणि सेमी-ऑटोमॅटिक गनमधून गोळीबार करत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

एस्पिरिटो सॅंटोचे गव्हर्नर रेनाटो कासाग्रांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हल्लेखोर हा शाळेचा माजी विद्यार्थी होता. तो मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आमच्याकडे आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू ठेवू आणि लवकरच अधिक माहिती गोळा करत आहे.

एस्पिरिटो सॅंटोचे सार्वजनिक सुरक्षा सचिव मार्सिओ सेलेंटे यांनी सचिवालयात एक व्हिडिओ जारी केला. ज्याच हल्लेखोर शूटर पब्लिक स्कूलचे कुलूप तोडून शिक्षकांच्या विश्रामगृहात घुसल्याचे दिसतेय.

- Advertisement -

गव्हर्नर रेनाटो कॅसग्रांडे यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, सर्व स्थानिक सुरक्षा दल तपासात गुंतले आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष-निर्वाचित लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनीही या गोळीबाराचे वर्णन अनपेक्षित शोकांतिका म्हणून केले. ब्राझीलमध्ये शालेय गोळीबार असामान्य आहे. परंतु, अलिकडच्या वर्षांत त्यात वाढ झाली आहे.


महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, मात्र इतर राज्यांत कडाका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -