घरदेश-विदेशशोपियांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

शोपियांच्या सिरमाल भागामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी सज्जाद मागरे असल्याचे देखिल सांगितले जात आहे. सय्याज हा रियाज नायकूचा जवळचा मानला जातो.

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये काल झालेल्या चकमकीनंतर आज शोपियांमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोपियांमधील सिरमाल भागात सकाळपासून चकमक सुरु आहे. चकमकी दरम्यान, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शोपियांच्या सिरमाल भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. घटनास्थळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवान चोख प्रत्युत्तर देत आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी सज्जाद मागरे असल्याचे देखील सांगितले जात आहे. सय्याज हा रियाज नायकूचा जवळचा मानला जातो. चकमकी दरम्यान, आतापर्यंत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

बडगाम चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चारी शरीफ परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. या चकमकी दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने याआधी १७ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली होती. पाकिस्तानच्या ५ रेंजर्सचा खात्मा करत १२ बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -