घरCORONA UPDATEदेशभरात आजपासून दुकाने उघडणार; मॉल्स, मद्य विक्रिची दुकाने मात्र बंदच राहणार

देशभरात आजपासून दुकाने उघडणार; मॉल्स, मद्य विक्रिची दुकाने मात्र बंदच राहणार

Subscribe

देशभरात आजपासून दुकाने उघडणार आहेत. मात्र, मॉल्स आणि मद्य विक्रिची दुकाने बंदच राहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दुकाने, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारने आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, देशातील सर्व दुकाने काही अटींवर आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयांने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार आजपासून हा आदेश लागू होणार आहे. महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. तसेच जे हॉटस्पॉट आहेत, अशा ठिकाणांमध्ये मात्र, दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मद्य विक्रिची दुकाने तसेच मॉल्स सुरु करण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्य सरकार घेणार निर्णय

या निर्णयावर राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार दुकाने सुरु ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकातात. तसेच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काम करणाऱ्या दुकानातील प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याव्यतिरिक्त पालिका आणि नगरपालिकांच्या बाजारपेठांमधील दुकाने मात्र येत्या ३ मेपर्यंत बंद राहणार आहेत. ती उघडता येणार नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा – corona live update : कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -