घरCORONA UPDATEसिनेकलाकारांचा फिल्म उद्योग जगतातील कर्मचारी, क्रू मेंमर्बंना मदतीचा हात

सिनेकलाकारांचा फिल्म उद्योग जगतातील कर्मचारी, क्रू मेंमर्बंना मदतीचा हात

Subscribe

भारतीय फिल्म उद्योग जगतातील सर्व दिग्गज कलाकारांनी मिळून फॅमिली या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून या परिस्थितीत घरामध्ये राहण किती आवश्यक आहे, सांगितलं आहे.

देशातील कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांना घरामध्ये बसावे लागत आहे. मात्र घरामध्ये राहूनच आपण कोरोनाचा मुकाबला करू शकतो, या सरकारच्या धोरणाला आता सिनेकलाकारांनीही पाठिंबा दर्शवल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय फिल्म उद्योग जगतातील सर्व दिग्गज कलाकारांनी मिळून फॅमिली या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून या परिस्थितीत घरामध्ये राहण किती आवश्यक आहे, सांगितलं आहे. बॉलीवूडपासून मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली अशा सर्व भाषेतील कलाकारांनी या शॉर्ट फिल्ममध्ये सहभाग दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनमुळे सिने जगतातील सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे, स्पॉटबॉय यांच्याकरता आर्थिक निधीदेखील उपलब्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे या कलाकारांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनाही या कठिण परिस्थितीत आर्थिक सहायता केली जात असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

या कलाकारांनी दर्शवला सहभाग

या शॉर्ट फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट, चिरंजीवी, मोहनलाल, ममोट्टी, सोनाली कुलकर्णी, प्रोसंजित बुंबा, शिवा राजकुमार, दिलजीत दोसान या सर्वच भाषेतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने आपापल्या प्रातांत, शहरा आणि मुख्य म्हणजे घरामध्ये याचे शूटींग केले आहे. कोणीही घराबाहेर पडले नाही. अखेरीस, बिग बी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी घरातच बसा, घरा बाहेर पडू नका, कोरोनाला हरवा हा संदेशही दिला आहे. तसेच या शॉर्टच्या माध्यमातून जाहिरातीतून मिळणारी रक्कम सिने उद्योग जगतातील चतुर्थ श्रेणी वर्गाला दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये केलं दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -