घरदेश-विदेशश्रद्धा हत्याकांडाची बिहारमध्ये पुनरावृत्ती, भर बाजारात जिवंत महिलेचे केले तुकडे

श्रद्धा हत्याकांडाची बिहारमध्ये पुनरावृत्ती, भर बाजारात जिवंत महिलेचे केले तुकडे

Subscribe

भागलपूर – श्रद्धा हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलेला असतानाच बिहारमध्येही हत्येची पुनरावृत्ती घडली आहे. धक्कादायक म्हणजे, याप्रकरणात जिवंत महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत. भर बाजारात एका ४० वर्षीय महिलेवर हल्ला करत कान-नाक, हाय-पाय आणि स्तन कापण्यात आले आहेत. नीलम देवी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून मोहम्मद शकील याने तिची हत्या केली आहे. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हेही वाचा – हिजाबसक्तीवरून इराण सरकार नरमले, महिलांच्या आदोलनाला यश

- Advertisement -

बिहारच्या भागलपूरमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे. नीलम देवी शनिवारी सायंकाळी पीरपैंती बाजारात गेल्या होत्या. सिंधिया पुलाजवळून नीलम देवी पायी जात असताना मोहम्मद शकील नामक आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. शकील एका कपड्यातून धारदार शस्त्र लपवून बाजारात आला होता. त्याने महिलेवर हल्ला करताच त्याने तिचे स्तन, हाथ-पाय आणि कान कापले. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. नेमकं काय घडतंय हे समजायच्या आतच आरोपीने तिथून धूम ठोकली. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. तर, परिसरात शांतता ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

महिला जमखी अवस्थेत होती तेव्हाच तिने आरोपीचे नावे पोलिसांना सांगितली. हा आरोपी त्याच बाजारपेठेत राहणारा आहे. त्यामुळे याप्रकरणातील तपासणीकरता पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

दरम्यान, आरोपीच्या चप्पला आणि उपरणं पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचा पती अशोक यादव याने म्हटलं आहे की, ‘पत्नी नीलम देवी शनिवारी रात्री बाराजात गेली होती. शकीलसोबत आमची पूर्वी कोणतीही दुश्मनी नव्हती. त्यामुळे अशाप्रकारे त्याने हल्ला का केला असेल याची कल्पना नाही. एवढंच नव्हे तर, नीलम देवी  नेहमी ऑटोने घरी जायची. परंतू, शनिवारीच्या रात्री ती पायी येत होती.’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -