मित्राला भेटायला गेली म्हणून श्रद्धाची हत्या; दिल्ली पोलिसांचा आरोपपत्रात दावा

श्रद्धा वालकर हत्येचा तपास सुरु केल्यापासून ७५ दिवसांत दिल्ली पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला विरोधात ६ हजार ६२९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १५० जणांचे जबाब आहेत. आफताबच्या नार्को चाचणीचा अहवाल, तांत्रिक पुरावे या आरोपपत्रात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र फॉरन्सिक व तांत्रिक पुरावे या आरोपपत्रात आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार आहे.

shradha was brutally murdered proved in forensic report as bone dna match with father delhi police inquiry

 

नवी दिल्लीः श्रद्धा वालकर तिच्या मित्राला भेटायला गेली होती. त्यामुळे आफताबला राग आला व त्याने श्रद्धाची हत्या केली, असा दावा करणारे आरोपपत्र दिल्ली पोलिसांनी स्थानिक न्यायालयात मंगळवारी दाखल केले.

श्रद्धा वालकर हत्येचा तपास सुरु केल्यापासून ७५ दिवसांत दिल्ली पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला विरोधात ६ हजार ६२९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १५० जणांचे जबाब आहेत. आफताबच्या नार्को चाचणीचा अहवाल, तांत्रिक पुरावे या आरोपपत्रात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र फॉरन्सिक व तांत्रिक पुरावे या आरोपपत्रात आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर आरोपत्रानुसार आफताबविरोधात आरोप निश्चिती होईल. आफताबने आरोप मान्य केले तर त्याला शिक्षा सुनावली जाईल. त्याने आरोप मान्य केले नाही तर त्याचा रितसर खटला चालेल.

श्रद्धा आरोपी आफताब पुनावालासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मे २०२२ मध्ये श्रद्धाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली. त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची कबुली आफताबने दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यास सुरुवात केली. पुढे तपास करत आफताबची पॉलिग्राफ व नार्को चाचणी करण्यात आली. या चाचणीत आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली.

श्रद्धाच्या हत्येच्या तपासासाठी दिल्ली पोलीस वसईला आले होते. तेथे दिल्ली पोलिसांनी काही जणांची चौकशीही केली. गेल्या महिन्यात श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला मोठा वेग आला. मीरा-भाईंदर व वसई विरार शहराचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली होती. आता डीएनए रिपोर्ट देखील मॅच झाला असल्याने त्याला मोठा पुरावा मानला जात आहे. कारवाई करण्यास खूप मदत होणार असल्याचे वालकर यांनी सांगितले होते.