घरक्राइमश्रद्धा हत्या प्रकरणाचे गूढ वाढले, पांडव नगरमध्ये सापडली मानवी कवटी आणि शरीराचे...

श्रद्धा हत्या प्रकरणाचे गूढ वाढले, पांडव नगरमध्ये सापडली मानवी कवटी आणि शरीराचे तुकडे

Subscribe

दिल्लीतील पांडव नगर येथील रामलीला मैदानात झाडांमध्ये एक मानवी कवटी आणि शरिराचे तुकडे सापडल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असून तिचे मुंडके अद्याप सापडले नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याचदरम्यान, दिल्लीतील पांडव नगर येथील रामलीला मैदानात झाडांमध्ये एक मानवी कवटी आणि शरिराचे तुकडे सापडल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे. सापडलेली कवटी आणि शरीराचे तुकडे पोस्टमार्टेमसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या मानवी अवयवाचा श्रद्धाच्या हत्येशी काही संबंध आहे का हे देखील तपासले जाणार आहे.

सापडलेले मुंडके हे बराच काळ फ्रिजमध्ये ठेवल्यासाऱखे दिसत असल्याचे समोर आले आहे. मात्र ते स्त्रीचे आहे की पुरुषाचे याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. यामुळे या मुंडक्याचे कनेक्शन श्रद्धा हत्या प्रकरणाशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुंडके मिळाल्याचे कळताच दिल्लीच्या डिसीपी प्रियंका कश्यप यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला. रामलीला मैदानातील झाडीत मंगळवारी संध्याकाळी मानवी कवटी सापडली होती. तर रविवारी शरिराचे तुकडे सापडले होते. त्यानंतर हे सर्व मानवी अवयव पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले असून ते एकाच व्यक्तीचे आहेत का याचा तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे अवयव फेकण्यात आले तेथील परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाणार आहेत. जेणेकरुन आरोपी पर्यंत पोहचता येणार असल्याचे कश्यप यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

श्रद्धा हत्या प्रकरणातही आरोपी आफताबने १८ मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. नंतर तिच्या शऱीराचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक याप्रमाणे १८ दिवस महरोलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची कबुली दिली आहे. पण अद्याप तिचे मुंडके सापडलेले नाही. यामुळे या सापडलेल्या मुंडक्याचा आणि मानवी शरिराच्या तुकड्यांचा या मुंडक्याशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -