घरट्रेंडिंगश्रद्धाचे मुंडकेच सापडेना, आफताब करतोय पोलिसांची दिशाभूल

श्रद्धाचे मुंडकेच सापडेना, आफताब करतोय पोलिसांची दिशाभूल

Subscribe

श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपी आफताबने आता उडवा उडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्ली पोलिसही चक्रावले आहेत.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. वसईत राहणाऱ्या श्रद्धाची १८ मे रोजी गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे दिल्लीतील जंगलात फेकल्याची कबुली तिचा लिव्ह इन पार्टनर आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिली आहे. पण श्रद्धाचे मुंडके नेमके कुठे फेकले हे लक्षात नसल्याचे सांगत आफताबने आता तुटक तुटक आणि दिशाभूल करणारी उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्ली पोलिसही चक्रावली असून जोपर्यंत श्रद्धाचे मुंडके सापडत नाही तोपर्यंत जंगलात सापडलेले मानवी शरीराचे तुकडे हे तिचेच असून तिचा मृत्यू झाल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांसमोर आहे. आफताबला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज गुरुवारी साकेत न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

यावेळी पोलीस या हत्याप्रकरणाच्या अधिक चौकशी आणि तपासाठी आफताबची कोठडीची मुदत वाढवून मागणार आहे. तसेच आतपर्यंत केलेल्या तपासाचा आणि चौकशीचा अहवालच न्यायालयासमोर सादर करणार आहे. आफताबने कुठलीही आदळआपट न करता ज्या तत्परतेने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ते पाहता पोलिसांनाही सुरुवातीला आशर्च्य वाटले होते. कारण अशा प्रकरणांमध्ये आरोपी इतक्या सहजासहजी गुन्हा कबूल करत नाही. पण आफताबने मात्र सगळा घटनाक्रमच शांतपणे पोलिसांना सांगितला. पण आता मात्र तो चाणाक्षपणे उडवाउडवीची उत्तरे देत आहे. कधी तो श्रद्धाचा मोबाईल मुंबईत फेकल्याचे सांगतोय तर कधी दिल्लीतील महरोलीच्या नाल्यात फेकल्याचे बोलतोय. श्रद्धाच्या मुंडकं आणि कपड्याबदद्ल बोलणे मात्र तो टाळतोय. यामुळेच दिल्ली पोलीस त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी न्यायालयात करणार आहे. य़ा घटनेची गंभीरता पाहता न्यायालय आफताबच्या नार्को टेस्टसाठी परवानगी देण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisement -

कशी असते नार्को टेस्ट?
कुठल्याही गुन्ह्यात जेव्हा पुराव्यांचा अभाव असतो त्यावेळी तपास संस्था नार्को टेस्टची मदत घेते. यात आरोपीला एक सायकोअॅक्टिव्ह औषध दिले जाते. तर काही वेळा सोडीयम पेंटोथोलचे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर अर्धवट शुद्धीत असलेल्या आरोपीची चौकशी करून त्याने केलेल्या गुन्ह्याचा छडा तोच सांगू लागतो. या टेस्ट वेळी मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर आणि पोलीस अधिकारी फॉरेंसिक तज्ज्ञ उपस्थित असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -