घरक्राइमआफताबकडून 2020 मध्येही श्रद्धाच्या हत्येचा प्रयत्न; पाठ अन् मानेवर मारहाणीच्या खुणा; डॉक्टरांचा खुलासा

आफताबकडून 2020 मध्येही श्रद्धाच्या हत्येचा प्रयत्न; पाठ अन् मानेवर मारहाणीच्या खुणा; डॉक्टरांचा खुलासा

Subscribe

वसईतील श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासात दररोज नवी धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मित्रांनंतर मुंबईतील एका डॉक्टरनेही आरोपी प्रियकर आफताब अमीन पूनावाला श्रद्धाला मारहाण करत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. एका मित्राने आफताबने केलेल्या मारहाणीचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत.

दरम्यान 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने आफताबच्या त्रासाला कंटाळून मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी श्रद्धाने तिला आफबातकडून होत असलेल्या त्रासाबद्दल आणि मारहाणीबद्दलची माहिती तिच्या मैत्रिणींनाही सांगितली, यावेळी पोलिसांनी आफताबला पोलीस ठाण्यात बोलवले. मात्र आत्महत्येची धमकी देत त्याने श्रद्धाला तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही आफबात श्रद्धाला मारहाण करत राहिला. याचे फोटो तिच्या मित्राने सादर केले आहेत. लिव्ह इनमध्ये राहतना तिला सगळ्या त्रासाचा सामना करत आफताबसोबत आनंदी राहायचे होते.

- Advertisement -

दरम्यान 3 डिसेंबर 2020 रोजी मुंबईच्या नालासोपारा भागात असलेल्या ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाठ, मान आणि खांद्यावर तीव्र वेदना होत असल्याने श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते  या वेदना मारहाणीच्या होत्या असे म्हटले जाते. श्रद्धाला अॅडमिट केले जात असताना आफताब स्वतः तिथे उपस्थित होता, मात्र मुलीच्या कुटुंबातून कोणीही आले नव्हते, हॉस्पिटलचे डॉ. एसपी शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

श्रद्धाच्या मित्रांच्या माहितीनुसार, आफताब श्रद्धाला गांजाच्या नशेत जब्बर मारहाण करायचा. दिल्लीला जाण्यापूर्वी 4 मे रोजी श्रद्धा आफताबसोबत उत्तराखंडच्या शिवपुरीच्या वशिष्ठ गुहेत गेली होती. ही गुहा गंगा नदीच्या काठी आहे. याठिकाणाहून श्रद्धाने शेवटची इन्स्टा रिल बनवली ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

- Advertisement -

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होते, मात्र आफताबचा दिल्लीत शिफ्ट होण्यास विरोध होता. यादरम्यान आफताब श्रद्धा सोबत असताना त्याच्या मोबाईलवरून कोणाशी तरी चॅट करायचा. यावेळी श्रद्धाने कोणाशी चॅट करतोस विचारल्यावर उडवाउडवीची उत्तर द्यायचा. यावरूनही अनेकदा दोघांमध्ये कडाक्याची भांडणं होत होती.


सातारा महापालिका निवडणुकीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंह राजेंवर पलटवार; म्हणाले…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -