घरदेश-विदेशश्रद्धाच्या डोक्यातील कवटीची आणि हाडांची केली पावडर; आरोपी आफताबची कबुली

श्रद्धाच्या डोक्यातील कवटीची आणि हाडांची केली पावडर; आरोपी आफताबची कबुली

Subscribe

श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. ज्याप्रमाणे या प्रकरणातील आरोपी असलेल्या आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केली ते ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो. पण आता या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाच्या कवटीची आणि हाडांची पावडर केल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. आजवर अनेक हत्याकांडाच्या घटना या देशात घडल्या आहेत. पण या घटनेतील आरोपी आफताब पूनावाला याने ज्या क्रूर पद्धतीने श्रद्धाची हत्या केली, ते ऐकून अंगावर काटा उभा राहतो. श्रद्धाचा मारेकरी आफताब याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पण आता या आरोपीने आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. या आरोपीने सांगितल्यानुसार त्याने श्रद्धाच्या डोक्याची कवटीची आणि हाडांची मिक्सरमध्ये घालून पावडर केली.

आफताबाने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या भागात टाकले. पण मंगळवारी (ता. 7 फेब्रुवारी) दिल्ली पोलिसांकडून या हत्या प्रकरणातील चार्जशीट दाखल करण्यात आली. दिल्ली पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या या चार्जशीटमध्ये आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा फोन मुंबईत जाऊन फेकला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी आणि श्रद्धाच्या मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी यासाठी त्याने तिच्या कवटीची आणि हाडांची मिक्सरमध्ये घालून पावडर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

2022 मध्ये आफताब पूनावाला याने 18 मे रोजी श्रद्धाची एका वादातून हत्या केली. हे दोघेही दिल्लीमध्ये छतरपूर भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबाने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते त्याने घरातील फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर तो नेहमी हे तुकडे दिल्लीमध्ये असलेल्या महरौलीच्या जंगलात नेऊन फेकत होता. दरम्यान, या घटनेच्या 5 महिन्यानंतर या दुर्दैवी घटनेचा खुलासा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला.

हेही वाचा – मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरूच

- Advertisement -

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे दोघे दिल्लीमध्ये एकत्र राहत होते. पण श्रद्धाच्या घरच्यांना तिचे हे नाते मान्य नव्हते. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी डिसेंबर 2022 मध्ये आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली. यामध्ये त्याने श्रद्धाची ज्या क्रूरतेने हत्या केली, याबाबतची माहिती दिली. पण या प्रकरणाची चौकशी सुरु असताना आरोपी आफताबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाला लव्ह जिहादच्या अँगलने पाहिले जात असून श्रध्दाच्या वडिलांनी आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी आणि श्रध्दाला लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -