घरक्राइमश्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला घ्यायचंय उच्चशिक्षण; कोर्टाकडे केली 'ही' मागणी

श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला घ्यायचंय उच्चशिक्षण; कोर्टाकडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

वसईतील श्रद्धा वालकर हत्येकांडामुळे संपूर्ण देश हादरला, श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याचे तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दिल्लीतील जंगलात फेकले. याप्रकरणी आरोप आफताब पुनावाला सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. मात्र तुरुंगातून त्याने आता साकेत कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. यात त्याने कोर्टाकडे एज्युकेशन सर्टिफिकेट मिळावे अशी मागणी केली आहे.

आफताबने यासोबत उच्च शिक्षणासाठी पेन, पेन्सिल, कोरी वही उपलब्ध करुन देण्याची विनंतीही कोर्टाकडे केली आहे. आफताब पुनावाला या अटक झाल्यानंतर त्याची सर्व कागदपत्र आता पोलिसांकडे आहेत. त्यामुळे आरोपी आफताबने वकील एमएस खान यांच्या वतीने साकेत न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने एज्युकेशन सर्टिफिकेट आणि सबंधित पुस्तक दिली जावी जेणेकरुन तो पुढील शिक्षण पूर्ण करुन शकेल, अशी मागणी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांकडून दाखल आरोपपत्राची सॉफ्ट कॉपीही आफताबला दिली आहे. या याचिकेत आफताबच्या वकिलाने त्याला दिलेले आरोपपत्र योग्य पद्धतीने असावे असे म्हटले, तसेच त्याला पेन- पेन्सिल, वही द्यावी, जेणे करुन त्याला नोट्स काढता येतील असंही आफताबने म्हटलं आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भात दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारीला 6629 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये हत्येशी संबंधित सर्व बाबींचा समावेश आहे. यात पोलिसांनी 100 साक्षीदारांची यादीही दाखल केली आहे.

- Advertisement -

आरोपी आफताब पुनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली, यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले, यानंतर रोज तिच्या शरारीचा तुकडा दिल्लीच्या जंगलात नेऊन फेकले. दरम्यान या हत्येच्या 6 महिन्यांनी पोलिसांनी त्याला अटक केली, दिल्लीच्या मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाची हाडं जप्त करण्यात आली आहेत. आफताब नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेय.

पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबने अगदी छोट्या कारणावरून रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितले. हत्येच्या दिवशी म्हणजे 18 मे 2022 रोजी दोघांचा मुंबईत जाण्याचा प्लॅन होता. पण आफताबने अचानक तिकीट रद्द केले आणि दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली.

यावेळी आफताबने श्रद्धाचा मृतदेह एका बॅगमधून हिमाचल प्रदेशला नेत तिथेच ठेवून येण्याचा कट रचला, यासाठी त्याने मार्केटमधून एक 1200 रुपयांची काळी बॅग देखील खरेदी केली. यासोबत आफताबने काही ट्रॅव्हल एजंटशी कॅब बुक करण्यासाठी बोलणी सुरु केली. पण याचवेळी आरोपी आफताबच्या डोक्यात आलं की, रस्तेमार्गे दिल्लीतून हिमाचल प्रदेशात जाताना महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी, तपासणी केली जाते. अशा परिस्थिती फसण्याची शक्यता आहे. या विचाराने आफताबने त्याचा प्लॅन रद्द केला. यानंतर त्याने तिच्या शरीराचे घरातील बाथरुमध्ये बसून 35 तुकडे केले त्यानंतर रोज एक एक करून ते दिल्लीच्या जंगलात फेकले. दरम्यान तिचे मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने एक मोठा फ्रीज देखील खरेदी केला होता.

एकीकडे तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकत होता तर दुसरीकडे ती जिवंत असल्याचं भासवण्यासाठी तिचा फोन वापरत होता. तसेच तिचं सोशल मीडिया अकाऊंटवरून तो सर्वांशी बोलत होता. तिच्या फोनवरील कॉल पण तो रिसिव्ह करून सोडायचा जेणेकरून या प्रकरणाचा उलगडा झाला आणि तपास पथकालाही तिचा फोन सापडला तर ती जिवंत आहे हे सर्वांना वाटेल.


राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांना फटका; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -