श्रद्धा वालकर हत्याप्रकरण : आफताबविरोधात चार्जशीट दाखल, आरोपीने केली नवीनच मागणी

shraddha walkar murder case why aftab amin poonawalla killed his live in partner sharaddha delhi police disclose

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताब पुनावालाविरोधात दिल्ली पोलिसांनी ६ हजार ६३६ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या आरोपपत्रात आरोपी आफताबवर गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. परंतु दिल्ली पोलिसांनी कोर्टात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीने एक नवीनच मागणी केली आहे.

खुद्द आरोपी आफताबला ते आरोपपत्र त्याच्या वकिलाला दाखवायचे नाहीये. त्यामुळे त्याने वकील बदलण्याची मागणी केली आहे. सध्या आफताबच्या न्यायलयीन कोठडीत ७ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ७५ दिवसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपीची पोलिसांनी नार्को टेस्ट केली आणि पॉलीग्राफी टेस्ट देखील करण्यात आली आहे. अनेक प्रकारचे प्रश्न-उत्तरं विचारण्यात आले. त्यानंतर हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान आरोपपत्र आपल्या वकिलाला दाखवू नये, तर त्याची प्रत त्याला उपलब्ध करून द्यावी, अशी आफताबची इच्छा होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या मागणीवर ७ फेब्रुवारीला दखल घेतली जाईल, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतरच आफताबला या प्रकरणी आरोपपत्र मिळू शकेल.

श्रद्धा आणि आफताब एकाच कंपनीत काम करायचे. त्यामुळे दोघांचं प्रेम जुळलं आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायला लागले. लग्नाच्या कारणावरुन दोघांमध्ये भांडण व्हायची. एके दिवशी आफताबने श्रद्धाचा खून करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. मे महिन्याच्या अखेरीत त्याने तिची हत्या केली. त्यामुळे आफताब तिहारच्या तुरुंगात बंद आहे.


हेही वाचा : मित्राला भेटायला गेली म्हणून श्रद्धाची हत्या; दिल्ली पोलिसांचा आरोपपत्रात दावा