घरदेश-विदेश"तो मला शोधून मारून टाकेल.." श्रद्धा वालकरच्या वडिलांनी कोर्टात ऐकवली रेकॉर्डिंग

“तो मला शोधून मारून टाकेल..” श्रद्धा वालकरच्या वडिलांनी कोर्टात ऐकवली रेकॉर्डिंग

Subscribe

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना आरोपी आफताब पुनावालाच्या विरोधात अनेक महत्वाचे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. सोमवारी अफताबला दिल्लीच्या साकेत कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी श्रद्धाचे वडील विजय वालकर सुद्धा तेथे उपस्थित होते.

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपी आफताब अमीन पुनावाला याच्याविरुद्ध युक्तिवाद केला. पोलिसांनी आरोपी आफताबला साकेत न्यायालयात हजर केले. यावेळी श्रद्धाचे वडील विजय वालकर हेही कोर्टात उपस्थित होते. कोर्टामध्ये दिल्ली पोलिसांकडून आरोपीविरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत.

आफताबच्या उपस्थितीत कोर्ट रूममध्ये ऑनलाइन समुपदेशनाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग चालवले गेले. या रेकॉर्डिंगमध्ये श्रद्धा “तो माझी शिकार करेल, मला शोधेल आणि मला मारेल” असे बोलताना ऐकू येत आहे. “एके दिवशी आफताबने माझा गळा धरला होता. यामुळे मी बेशुद्ध झाले होते, ज्यामुळे मला श्वास घेणे देखील जमत नव्हते.” अशी माहिती ती तिच्या डॉक्टरांना देत असल्याचे या रेकॉर्डिंगमधून ऐकू येत आहे.

- Advertisement -

विशेष सरकारी वकील (एसपीपी) अमित प्रसाद आणि मधुकर पांडे यांनी दिल्ली पोलिसांच्या बाजूने या प्रकरणात आपली बाजू मांडली. यावेळी एसपीपी अमित प्रसाद म्हणाले की, विश्वासार्ह आणि ठोस पुराव्यांद्वारे या प्रकरणाची गंभीर परिस्थिती स्पष्टपणे समोर आली आहे आणि ज्यामुळे या घटनांची एक साखळी बनत आहे.

साकेत न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी केलेल्या सबमिशनला उत्तर देण्यासाठी कायदेशीर मदत वकील (एलएसी) जावेद हुसैन यांना वेळ दिला आहे. या प्रकरणाचा पुढील युक्तिवादा हा २५ मार्चला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर या प्रकरणी बोलताना अमित प्रसाद आणि मधुकर पांडे म्हणाले की, आरोपीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित करण्यासाठी सबळ परिस्थितीजन्य पुरावे सापडले आहेत. यावेळी अमित प्रसाद यांनी या प्रकरणातील साक्षीदारांना यावेळी साकेत कोर्टात हजर केले, ज्यांनी घटनेच्या आधी श्रद्धाला शेवटचे पाहिले होते.

आफताब आणि श्रद्धा ज्यावेळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, तेव्हा त्यांचा हिंसक भूतकाळ होता, असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. 23 नोव्हेंबर 2022 रोजी श्रद्धाने दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित कागदपत्रे मुंबईच्या वसई पोलीस ठाण्यातूनही मिळाली आहेत, असेही दिल्ली पोलिसांनी यावेळी कोर्टात सांगितले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दिलेल्या तक्रारीत श्रद्धाने आफताबवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप केला, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि तुकडे करण्याची धमकी देणे, अशा पद्धतीचे आरोप केले होते.


हेही वाचा – मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस मागे; पण अटकेची टांगती तलवार कायम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -