घरताज्या घडामोडीकोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी पुढील वर्षाची वाट पाहवी...

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी पुढील वर्षाची वाट पाहवी लागणार

Subscribe

बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रा सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या भाविकांना पुढील वर्षांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोरोनामुळे जम्मू काश्मीर प्रशासनाने यावर्षी सुद्धा अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली. गेल्या वर्षीसुद्धा कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.

हिमालयाच्या उंच भागात ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवच्या गुहेतील मंदिरासाठी ५६ दिवस चाललेली यात्रा २२ जून रोजी पहलगाम आणि बालटाल मार्गे सुरू होणार होती आणि २२ ऑगस्टला संपणार होती. पण यावर्षी पुन्हा एकदा अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी प्रतिकात्मक स्वरुपात यात्रा होईल. सर्व पारंपारिक विधी पूर्वीप्रमाणे केले जातील. लोकांचा जीव वाचवणे हे खूप महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.’

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, ‘अमरनाथ श्राइन बोर्ड करोडो भाविकांच्या भावना समजतात आणि हे लक्षात घेऊन बोर्डाने सकाळी आणि संध्याकाळच्या आरतीचे लाईव्ह दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज दोन आरतीचे लाईव्ह दर्शन करण्याची व्यवस्था केली जाईल.’

यासंबंधित अमरनाथजी श्राइन बोर्डचे सीईओ भारतीय प्रशासनिय सेवाचे अधिकारी नीतीश्वर कुमार म्हणाले की, ‘२२ ऑगस्ट रोजी छडी मुबारक पवित्र गुहेत पोहोचवले जाईल. याशिवाय रक्षाबंधन दिवशी अमरनाथ यात्रा संपेल.’ अमरनाथ श्राइन बोर्डने देशातील एकंदरी कोरोनाची परिस्थिती पाहून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -