घरAssembly Battle 2022UP Elections 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राम विमानतळाच्या रनवे बांधकामाला सुरूवात,...

UP Elections 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राम विमानतळाच्या रनवे बांधकामाला सुरूवात, पहिल्या टप्प्यात किती होणार खर्च?

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राम विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. विशाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमधील बंगळुरूचे कर्मचारी आणि श्रमिक रनवेच्या बांधकामासाठी साफ-सफाई करण्यास गुंतले आहेत. या बांधकामांत १० हून अधिक जेसीबी उपलब्ध आहेत. विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रकल्पाचे प्रभारी राजीव कुलश्रेष्ठ यांच्यासह चार महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीव कुलश्रेष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्याचे काम सुमारे दीड वर्षात पूर्ण होईल. तसेच पहिल्या टप्प्यात सुमारे १५० कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत बरेली येथे योग्य वेळेत विमानतळ बांधणारे कुलश्रेष्ठ यांना येथील श्री राम विमानतळाच्या बांधकामासाठी प्रकल्प प्रभारी पदावर स्थान देण्यात आले आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम (ATC) च्या टर्मिनल इमारतीचे कंत्राट नवी दिल्लीच्या SK इंटिग्रेटेड कंपनीला देण्यात आले आहे.

संचालक लालजी यांच्यासह दोन सहाय्यक महाव्यवस्थापकांची आधीच नियुक्ती करण्यात आली आहे. रनवेंच अंतर पंधराशे मीटर आहे. पहिल्या टप्प्यात एटीआर-७२ विमानांसाठी रनवे बांधलं जाणार आहे. पर्यावरणीय स्वीकृती मिळाल्यानंतर पीएम मोदींच्या हस्ते विमानतळाच्या पायाभरणाची तयारी सुरू होती. दरम्यान, ८ जानेवारीला निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे पायाभरणीची वाट न पाहता आचारसंहिता लागू झाल्यानंतर विशाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रनवेचे काम सुरू केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : औरंगाबादसह देशातील १३ विमानतळांचं लवकरच होणार नामकरण, कॅबिनेट मंजुरीसाठी प्रस्ताव येणार – डॉ. भागवत कराड


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -