Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश राम मंदिरात 'या' दिवशी होणार रामल्लाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या मंदिरांची रचना

राम मंदिरात ‘या’ दिवशी होणार रामल्लाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या मंदिरांची रचना

Subscribe

मुंबई | श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) पुढील वर्ष २२ जानेवारीला रामल्लाला (Ram Mandir Ayodhya) अभिषेक करण्याची तारीख निश्चित केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपतरायनी गुरुवार दिली आहे. उत्तर प्रदेशातील हॉटेल क्रिनोस्को येथे सराफा मंडळ असोसिएशनच्या प्रांतीय अधिवेशनाला संबोधित करताना म्हणाले की, अनेक तारखांवर झालेल्या चर्चेनंतर २२ जानेवारी २०२४ रोजी रामल्लाच्या मूर्तींचा अभिषेक करण्याचा प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

यासाठी सप्टेंबरपर्यंत रामल्लाच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधणकामात मकराना संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंपत राय यांनी सराफ व्यापाऱ्यांसमोर मंदिर उभारणीची प्रक्रिया सांगितली असून तळमजल्यावर फक्त रामल्लाच बसतील, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल, तर दुसरा मजला रिकामा असेल, ज्यांचा उपयोग मंदिराच्या उंचीसाठी वापरला जाणार आहे. शिखर, आसन आणि दरवाजामध्ये सोन्याचा वापर करण्यात आल्याची माहिती देखील चंपत राय यांनी यावेळी दिली आहे. मंदिरातील गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेश सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेशचंद्र जैन यांनी चंतप राय यांना पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला. मंदिरा संबंधित माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले.

पाच मिनिट रामललाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा टिळक

- Advertisement -

चंपत राय यांनी सांगितले की, रामल्लाची मूर्ती ही अयोध्यामध्येच तयार होणार आहे. या मंदिरात रामल्लांची मूर्तीही पाच वर्षाच्या बालकांची असणार आहे. रामनवमीच्या दिवशी रामललाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा टिळक लावता यावा, यासाठी शास्त्रज्ञांचे पथक निश्चित केले असून या शास्त्रज्ञांच्या पथकाने आपले काम जवळपास पूर्ण केले आहे. या सर्वांची देखरेक स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रामल्लाच्या कपाळावर पाच मिनिटे सूर्यकिरण राहणार आहे, याला सूर्य टिळक नाव देण्यात आले आहे. चंपत रायनी पुढे म्हणाले, “रामल्ला दररोज नवीन वस्त्र परिधान करण्यात येणार आहे. रामल्लाचे जुने वस्त्र हे शुभ शगुन म्हणून भक्त मागतील आणि त्यांना ते उपलब्ध करून दिले जातील.”

भाविकांच्या सोयी-सुविधांकडे खास लक्ष

भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तीर्थक्षेत्र सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बांधण्यात येणाऱ्या केंद्रात २५ हजार प्रवाशांना मंदिरात प्रवेश करताना पेन, पर्स, बेल्ट, मोबाइल आणि इतर वस्तू बंदी असणार आहे. वृद्ध आणि अपंग भाविकांसाठी एक रॅम्प आणि तीन लिफ्टची सोय असणार आहे. याशिवाय दोन सीटवर ट्रीटमेंट प्लांट बांधण्यात येणार आहे. कॅम्पसमध्ये पर्यावरण रक्षणाची देखील काळजी घेण्यात आली आहे. कॅम्पसमध्ये ७० टक्के ओपन एरिया ठेवण्यात आला आहे.

 

 

- Advertisment -