Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारतातील 'या' ठिकाणी आजही दररोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!

भारतातील ‘या’ ठिकाणी आजही दररोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!

Subscribe

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. संपूर्ण भारतात श्री रामांचे देखील अनेक भक्त आहेत. अनेकांची श्री रामांवर अपार श्रद्धा आहे. अयोध्या हे श्री रामांचे जन्म स्थान आहे. निश्चितच त्यांचा या ठिकाणी निरंतर वास असतो. मात्र, अयोध्येव्यतिरिक्त भारतात असे एक ठिकाण आहे. जिथे श्री राम रोज सकाळी येतात आणि संध्याकाळनंतर ते तिथून निघून जातात. हे ठिकाण मध्य प्रदेशातील ओरछा शहरामध्ये आहे.

मध्य प्रदेशातील ओरछा शहरातील स्थानीक लोकांच्या मते, श्री राम आजही रोज सूर्योदयानंतर येतात आणि ओरछा येथील राजवाड्यात मुक्काम करतात. शिवाय या ठिकाणी श्री रामांना बंदूकीने सलामी दिली जाते. अनेकांना श्री राम येथे येत असल्याचा भास होतो. खरं तर या ठिकाणी श्री राम दररोज येण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते.

काय आहे पौराणिक कथा

- Advertisement -

पौराणिक कथेनुसार, ओरछा येथील राजा मधुकरशाह कृष्ण भक्त होता आणि महाराणी कुंवर गणेश राम भक्त होती. एकदा राजाला कृष्णाची पूजा करण्यासाठी वृंदावनात जायचे होते आणि राणी अयोध्येला जायचे होते. यामुळे राजा आणि राणीमध्ये वाद सुरु झाला. त्यामुळे राजा नाराज झाला आणि राणीला म्हणाला की, जर तुम्ही खऱ्या राम भक्त असाल तर श्री रामांना ओरछामध्येच यायला सांगा. त्यानंतर राणी अयोध्येला गेली. तिथे जाऊन तिने कठोर तपश्चर्या सुरु केली. मात्र, तिच्या तपावर श्री राम प्रकट झाले नाहीत. त्यामुळे तिने शरयू नदीत उडी मारली. असं म्हणतात की, राणीची भक्ती पाहून भगवान राम नदीच्या पाण्यातच तिच्या मांडीवर आले. तेव्हा राणीने रामाला अयोध्येहून ओरछाला जाण्याचा आग्रह केला, तेव्हा त्यांनी राणीला तीन अटी घातल्या.

पहिली गोष्ट म्हणजे इथून निघून गेल्यावर मी जिथे बसतो तिथून उठणार नाही. दुसरी अट म्हणजे ओरछाचा राजा म्हणून विराजमान झाल्यानंतर तिथे इतर कोणाचीही सत्ता राहणार नाही आणि तिसरी अट म्हणजे विशेष पुष्य नक्षत्रामध्ये ऋषिमुनींसह लहान मुलाच्या रुपात पायी घेऊन जाण्याची होती.राणीने या तिन्ही अटी मान्य केल्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे श्री राम ओरछा येथे येऊन येथील राजा म्हणून विराजमान झाले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

भारतातील 5 रहस्यमय मंदिर : ज्यातील घटना तुम्हालाही आश्चर्यचकित करतील

- Advertisment -