घरताज्या घडामोडीश्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंची भागम भाग, मालदीवहून सिंगापूरकडे

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंची भागम भाग, मालदीवहून सिंगापूरकडे

Subscribe

आर्थिक अराजकता आणि त्यानंतर उसळलेल्या जनक्षोमामुळे देश सोडून सहकुटुंब मालदिवच्या आश्रयाला गेलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांची सध्या भागम भाग सुरू आहे.

आर्थिक अराजकता आणि त्यानंतर उसळलेल्या जनक्षोमामुळे देश सोडून सहकुटुंब मालदिवच्या आश्रयाला गेलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांची सध्या भागम भाग सुरू आहे. मालदिवमध्ये पळून गेलेले राजपक्षे आता सौदी एअरलाईन्सच्या विमानातून सिंगापूरला गेले असून तेथून ते सौदी अरबमध्ये जाणार आहेत.

याबदद्ल वृत्तसंस्था एपीने माहिती दिली आहे. त्यानुसार गोताबाया आता सिंगापूरला गेले असून तेथून ते सौदी अरबमध्ये जेद्धाला जाणार आहेत. मालदिवच्या सरकारी अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला आहे. देशाला अर्थिकसंकटात ढकल्याचा आरोप राजपक्षे यांच्यावर असून राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याविरोधात श्रीलंकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी प्रक्षुब्ध नागरिकांनी राजपक्षे यांच्या राष्ट्रपती भवनावरच हल्ला करत त्यावर ताबा मिळवला. जनतेला देशोधडीला लावून राजपक्षे मात्र राष्ट्रपती भवनात सुखाधिन आयुष्य जगत आहेत. असा आरोप करत आंदोलकांनी धुडगूस घातला. राष्ट्रपती भवनातील स्विमींग पूलमध्ये उड्या मारण्यापासून किचनमध्ये जेवणावर ताव ते थेट राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आराम करण्याचे सगळेच प्रताप जनतेने केले. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. मात्र या सगळ्या गोंधळात जीवाच्या भीतीने राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे लष्कराच्या सुरक्षेत सहकुटुंब थेट मालदिवला पळाले.

- Advertisement -

SHRILANKA

त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती अधिकाराच्या अंतर्गत काही निर्णयही घेतले. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे देशाची जबाबदारी सोपवून गोताबाया मालदिवला गेले. तर दुसरीकडे गोताबाया देश सोडून पळाल्याचे समोर येताच चवताळलेल्या नागरिकांनी राष्ट्रपती भवनाप्रमाणेच पंतप्रधान निवासस्थानावर आणि कार्यालयावर हल्ला केला. यामुळे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली असून हिंसक जमावावर थेट कारवाई करण्याचेच आदेश लष्कराला दिले आहेत. यामुळे श्रीलंकेच्या रस्त्यावर आता लष्कराच्या टँक फिरताना दिसत आहेत. तर जीवाच्या भीतीने राजपक्षे मात्र देशोधडीला लागले आहेत.

 

 

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -