Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश RCB च्या पराभवामुळे शुभमन गिलची बहिण अभद्र भाषेत ट्रोल; महिला आयोगाने घेतली दखल

RCB च्या पराभवामुळे शुभमन गिलची बहिण अभद्र भाषेत ट्रोल; महिला आयोगाने घेतली दखल

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील शेवटच्या 70 व्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळताना शुभमन गिलने शानदार शतक केले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आणि आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. त्यामुळे नाराज चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला अभद्र भाषेत ट्रोल करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवत शुभमन गिलच्या बहिणीला बलात्काराच्या धमक्या देण्याऱ्या ट्रोलर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले की, ‘शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोल करताना ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अत्यंत अभद्र, आक्षेपार्ह, स्त्रीद्वेष आणि धमकी देणारी भाषा वापरण्यात आली आहे. तिला बलात्कार आणि हल्ला करण्याच्या देखील धमक्या सोशल मीडियावरून देण्यात आल्या आहेत. हा गंभीर गुन्हा असल्यामुळे ट्रोलर्सविरुद्ध गुन्हा दाखल करावा. (Shubman Gill’s sister trolled with vulgar language after RCB defeat)

- Advertisement -

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी ट्विटर करताना म्हटले की, शुभमन गिलच्या बहिणीविरूद्ध ऑनलाईन ट्रोलिंगची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. पोलिसांना 26 मे पर्यंत या प्रकरणी सविस्तर रिपोर्ट द्यावा लागेल. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मोकळे सोडता कामा नये. याशिवाय आम्ही या नोटिसद्वारे गुन्हा दाखल केल्याची कॉपी पोलिसांकडे मागितली आहे. तसेच आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. जर या प्रकरणी अटक झाली नाही तर आम्ही पोलिसांना या ट्रोलिंग करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबतची माहिती महिला आयोग मागवू शकते, अशी माहिती स्वाती मलिवाल यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -