घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटक मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या यांची घोषणा लवकरच, डी.के.शिवकुमार राहुल गांधींच्या भेटीसाठी रवाना

कर्नाटक मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या यांची घोषणा लवकरच, डी.के.शिवकुमार राहुल गांधींच्या भेटीसाठी रवाना

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दुपारी एक वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्या १८ मे रोजी शपथविधी होईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

Karantaka Election 2023 नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दुपारी एक वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi) हे दुपारी एक वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्या १८ मे रोजी शपथविधी होईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार डी.के.शिवकुमार (DK Shivakumar) यांची मुख्यमंत्रीपदाची संधी पुन्हा एकदा हुकताना दिसत आहे. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह ऊर्जा आणि जलसिंचन विभागा दिला जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे कायम राहाण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

काँग्रेसने दोन सूत्र तयारी केली आहेत. त्यातील एक मान्य होण्याची शक्यता आहे.
१) सिद्धरमय्या पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहातील. उर्वरित अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद डीके शिवकुमार यांना दिले जाईल. मात्र यावर दोन्ही नेत्यांचे एकमत होऊ शकले नाही.

२) सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्रीपद आणि डीके शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्षपदासह दोन महत्त्वाचे मंत्रालय देण्याचा दुसरा प्रस्ताव देण्यात आला. यावर अद्याप दोन्ही नेत्यांनी आपले मत व्यक्त केलेले नाही.

- Advertisement -

सिद्धरमय्या हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. वरुणा मतदारसंघातून त्यांना १,१९,८१६ मते मिळाली, आणि ४६,१६३ मतांच्या फरकाने ते विजयी झाले आहे.

हेही वाचा : Karnataka मुख्यमंत्री पदावरील तिढ्या दरम्यान डी.के. शिवकमार म्हणाले; ‘मी पक्षाला ब्लॅकमेल किंवा बंडखोरी करणार नाही, पण…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -