घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटकच्या इतिहासात मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरमय्या...

कर्नाटकच्या इतिहासात मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरमय्या…

Subscribe

कर्नाटकाच्या इतिहासात सिद्धरमैय्या ही पहिली व्यक्ती आहे की, ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Result 2023) निकाल हाती आले आहेत. यात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे तर, भाजपचा पराभव  झाला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहेत. यामुळे आता कर्नाटकात काँग्रेस कोणाला मुख्यमंत्री देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा सिद्धरमैय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्रीपदाची (Karnataka Chief Minister,) धूरा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात सिद्धरमैय्याच्या कार्यकाळात आयटी आणि बायो टेक्नोलॉजीचे हब बनले. यानंतर बंगरूळुला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाऊ लागले. सिद्धरमैया हे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसने सिद्धरमैय्या यांना २०१३-२०१८ साली मुख्यमंत्री बनविले होते. कर्नाटकात काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरमैय्या हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

- Advertisement -

कोण आहेत सिद्धरमैय्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता सिद्धरमैय्या यांचा जन्म कर्नाटकात १२ ऑगस्ट १९४८ मध्ये झाला. गेल्या चार दशकापासून सिद्धरमैय्या कर्नाटकाच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्ती मानले जातात. यापूर्वी सिद्धरमैय्या जेडीएसमध्ये होते. तेव्हा सिद्धरमैय्या जेडीएसचे दिग्गज नेत्यांपैकी एक होते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एचडी देवगौडाच्या खास लोकांपैकी एक होते. पण, देवगौडांनी जेडीएसची सूत्रे ही त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांच्या हाता दिली. यानंतर सिद्धरमैय्यांनी पक्षाला राम राम ठोकल्यानंतर २००५ मध्ये सिद्धरमैय्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसने त्यांना कर्नाटकाचा मुख्यमंत्री बनविले. २०१८ मध्ये सिद्धरमैय्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण, यात एका जागेवर सिद्धरमैय्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

‘या’ योजना सिद्धरमैय्यांनी राबविलेल्या योजना

सिद्धरमैय्यांनी मुख्यमंत्री असताना राज्यातील गरिबांसाठी महत्त्वाच्या योजना आल्या. यात अन्न भाग्य योजना, इंदिरा कॅन्टीन आणि क्षीर-भाग्य योजना सारख्या योजना राबविल्या. या योजनेद्वारे गरीब लोक आणि शाळेतील मुलांना मोफत जेवण मिळते. कर्नाटकाच्या इतिहासात सिद्धरमैय्या ही पहिली व्यक्ती आहे की, ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

सिद्धरमैय्यांनी त्यांच्या काळात शिक्षण, स्री आणि बालमृत्यू या योजना आणल्या. यामुळे कर्नाटकातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. सिद्धरमैय्यांनी मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायत अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर १६ महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आणल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -