घरदेश-विदेशकाँग्रेस-जेडीस आघाडी सरकारच्या पराभवामागे मी नाही - सिद्धारमैया

काँग्रेस-जेडीस आघाडी सरकारच्या पराभवामागे मी नाही – सिद्धारमैया

Subscribe

काँग्रेस- जेडीसच्या आघाडी सरकारचा झालेला पराभव माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धारमैयांना चांगल्याच जिव्हारी लागला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनामा सत्रामागे खुद्द सिद्धारामैया असल्याची चर्चा अनेक माध्यमांवर केली जात होती. इतकेच काय भाजप नेते आणि काँग्रेस- जेडीस मधील एका गटाने सिद्धारमैया यांना आधी खलनायक घोषित करून टाकले होते. या सर्व प्रकारावर सिद्धारमैया यांनी आज नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नाराजी व्यक्त केली आहे.

नेमके काय म्हणाले सिद्धारमैया?

आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त करताना सिद्धारमैया म्हणाले की, ‘काँग्रेस- जेडीसच्या आमदारांच्या बंडामागे तसेच आघाडी सरकारचा पराभव माझ्यामुळे झाला, असे अनेक आरोप माझ्यावर केले जात आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. माझी प्रतिमा मालिन करण्यासाठी काही माध्यमे हे सगळे खेळ खेळत आहेत. मुख्यमंत्री असतानासुद्धा माझ्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. जनतेसाठी मी ते सहन केले. मात्र इथून पुढे असले आरोप केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल’, असे सिद्धारामैया म्हणाले. बंडखोर आमदारांच्या आरोपांवर बोलतांना सिद्धारामैया म्हणाले की, ‘जनतेच्या आक्रोशाला घाबरून बंडखोर आमदार काँग्रेस- जेडीसच्या आघाडी सरकारच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडीत आहेत. वेळे आल्यावर सगळ्या गोष्टी समोर येतील आणि चित्र स्पष्ट होईल’, असा विश्वास सिद्धारमैया यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 कुमारस्वामी त्यांच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएसची आघाडी सरकार कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकली नाही. काँग्रेस- जेडीएसच्या आघाडीला ९९ तर भाजपच्या पारड्यात १०५ मत आली. कर्नाटक विधानसभेत एकूण २२५ जागा आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल वजुभाई वाला यांच्याजवळ सुपूर्द केला आहे.


हेही वाचा – कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार गडगडले, विश्वासदर्शक ठराव हरले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -