घरताज्या घडामोडीLive Update: ५ नोव्हेंबरपासून राज्यात नाट्यगृह सुरु होणार

Live Update: ५ नोव्हेंबरपासून राज्यात नाट्यगृह सुरु होणार

Subscribe

५ नोव्हेंबरपासून राज्यात नाट्यगृह सुरु होणार

राज्यात ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह ५० टक्क्यांच्या मर्यादेने सुरु करण्यात येणार

- Advertisement -

राज्य सरकारचा मोठा निर्णय ( खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार)


शुक्रवारी राज्यात गेल्या २४ तासात ४,३६० रुग्ण बरे होऊन घरी परतले तर राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८६,३४५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४ % एवढे झाले आहे. राज्यात ४,३१३ नवीन रुग्णांचे कोरोनाबिधीतांची नोंद झाली आहे. राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

- Advertisement -

इम्पेरिकल डेटा तात्काळ तयार करता येईल का याबाबत विचार सुरु आहे. इम्पेरिकल डेटा तयार होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागला तर निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. ( सविस्तर वाचा )


बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही मात्र ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून राज्य मागास आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला (सविस्तर वाचा )


OBC आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, ओबीसी आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता

मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात होणार चर्चा, सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता?


उद्या मुंबईतील सर्व शासकीय आणि सार्वजनिक केंद्रांवर कोरोना लसीचा केवळ दुसरा डोस बाकी असलेल्यांचं लसीकरण पार पडणार


सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये सलायनमध्ये झुरळ निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघड. निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय बालिकेला २७ ऑगस्टला ब्रॉकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार देखील सुरु होते. उपचारादरम्यान या सलाईन बॉटलची तपासणी केल्यानंतर त्यात झुरळ आढळल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानी केला.


अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत दाखल


सिद्धार्थ शुक्लावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार होणार


भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी; पहिल्यांदाच सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार

भारतीय शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत असून शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार पोहचला आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात, सेन्सेक्स २१७ अंकांनी उसळी घेत ५८ हजार ०६९ वर पोहोचला. तर निफ्टी ६६.२० गुणांनी वाढून १७ हजार ३०० वर पोहोचला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्याने केलेल्या प्राणघात हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्याशी शुक्रवारी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून चौकशी केली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांना लवकर बरे व्हा असे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी नक्की मारेकऱ्यावर कठोर कारवाई होईल असे आश्वासन ही दिले आहे. यावेळी, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा आदी उपस्थित होते.


टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रवीण कुमारनं हाय जंप (उंच उडी) T64 प्रकाराच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली आहे.


‘त्या’ याचिकेसोबत दुरान्वयेही संबध नाही – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका अशा आशयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली बातमी तथ्यहिन असून वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. बारामती नटराज नाट्य कला संस्थेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील अभिजित कुलकर्णी यांनी दिली आहे. तर माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून प्रसार माध्यमांमधील बातम्या तथ्यहीन आहेत. ‘त्या’ याचिकेसोबत दुरान्वयेही संबध नाही, अशी याचिकेच्या बातमीवर अजित पवारांनी माहिती दिली आहे.


उद्या होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, राज्य सरकारचं परिपत्रक जारी

एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा उद्या होणार आहे. परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच परीक्षास्थळी त्यांना लवकर पोहोचता यावं यासाठी त्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना लोकलमधून प्रवास करायचा असल्यास त्यासाठी त्यांना परीक्षेचं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे.


आज बेळगाव महापालिका निवडणूकीसाठी होणार मतदान

३ सप्टेंबर रोजी बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (आज) सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.


गणेशोत्सवानिमित्त कोकण वासियांसाना उपलब्ध होणार AC रेल्वे

दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने २१७ अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाश्यांच्या सोयीसाठी वातानुकूलित ८ विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -