Sidhu Moose Wala Murder: कॅनडातून हत्येची सुपारी, तिहारमध्ये कट, ३० गोळ्या

सिद्धू मुसेवालाच्या हत्येने देशात खळबळ उडाली असून या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडातील गोल्डी ब्रार या गँगस्टरने घेतली आहे. तो पंजाबमधील कुख्यात गँगस्टर असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे.यामुळे पंजाबमधील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

लोकप्रिय रॅपर आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मुसेवाला याची रविवारी पंजाबमधील मनसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पंजाबच नाही तर देशात खळबळ उडाली असून या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडातील गोल्डी ब्रार या गँगस्टरने घेतली असून तो पंजाबमधील कुख्यात गँगस्टर असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे.

यामुळे पंजाबमधील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हत्याकांडात हल्लेखोरांनी AN-94 चा असॉल्ट रायफलचा वापर केल्याचे समोर आले आहे. पंजाबमध्ये पहील्यांदाच गँगवॉरमध्ये AN-94 चा वापर करण्यात आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. तीन गाड्यांमधून आलेल्या ८ ते १० हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवालाच्या गाडीवर तब्बल ३० ते ३५ गोळ्या झाडल्या. त्यातील ८ गोळ्या सिद्धूला लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान. या हत्येची जबाबदारी जरी गोल्डी ब्रार गँगने घेतली असली तरी सिद्धूच्या हत्येमुळे उत्तरेकडील गँगवॉर समोर आले आहे.

या गँगवॉरमधूनच सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्ये रचण्यात आला. कट यशस्वी करण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोईने कॅनडामध्ये असलेल्या दुसऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारला फोनवरून सूचना दिल्या. त्यानंतर सिद्धूच्या घराची तसेच तो नेहमी ज्या ठिकाणी भेट देतो अशा ठराविक ठिकाणांची रेकी करण्यात आली. यादरम्यान शार्प शूटर्सही नेमण्यात आले होते. पण सिद्धू मुसेवालाला सरकारी सुरक्षा देण्यात आल्याने हल्लेखोर योग्य संधीच्या शोधात होते.  योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच सि्द्धू मुसेवालची सुरक्षा अंशत कमी करण्यात आली होती. त्यानुसार नेहमी त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या मागेपुढे असणाऱ्या चार पोलिसांच्या जागी दोनच पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले. तसेच सिद्धू नेहमी बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास करायचा मात्र रविवारी तो दोन मित्रांसह साध्या गाडीतून घराबाहेर पडला आणि हल्लेखोरांनी संधी साधली. काही अंतरापर्यंत हल्लेखोराच्या तीन गाड्यांनी त्याचा पाठलाग केल्यानंतर मानसा येथे एका ठऱाविक ठिकाणी त्याच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. त्यात ड्रायव्हिंग करत असलेल्या सिद्धूला ८ गोळ्या लागल्या. तर त्याच्या बाजूच्या आणि मागच्या सीटवर बसलेले मित्रही यात जखमी झाले आहेत.

सिद्धूच्या हत्येमागचे नेमके कारण
गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२१ साली गँगस्टर विक्की मिद्दुखेडाचा मर्डर झाला होता. या हत्येत सिद्धूचा सहभाग असल्याचा दावा गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईने केला आहे. विक्की हा लॉरेन्सचा जीवलग मित्र होता. दविंदर बंबीहा गँगने त्याचा काटा काढला होता. या गँगला सिद्धू मुसेवालाने आश्रय दिला होता. हीच गोष्ट बिश्नोई गँगला खटकली होती. यातूनच मुसोवालला जन्माची अद्दल घडवण्याचा निश्चय लॉरेन्सला केला.

शाहरुखला दिली सुपारी
लॉरेन्स आणि गोल्डी ब्रारने सि्दधू मुसेवालाची सुपारी शाहरुख नावाच्या एका गुंडाला दिली होती. पण त्याला स्पेशल सेलने अटक केली. त्यानंतर चौकशीत त्याने ८ जणांची नावे पोलिसांना सांगितली. यात त्याने पंजाबी सिंगर मनकिरत औलखचा मॅनेजरचेही नाव घेतला. शाहरुखने चौकशीत सांगितले की तो भोला आणि सोनू काजलबरोबर मुसेवालाच्या गावीही गेला होता. पण तिथे सिद्धूच्या तैनातीला असलेल्या सुरक्ष रक्षकांकडे 4 पीएसओ AK-47 बघून त्यांनी त्याच्या हत्येचा प्लान रद्द केला. त्यानंतर गोल्डीने सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी हल्लेखोरांना UZI हत्यार दिले. तर शाहरुखने सिद्धूच्या हत्येसाठी AK-47 आणि बियर स्प्रेची मागणी केली होती. लॉरेन्सने गोल्डी ब्रारला शाहरुखला संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर कॅनडाहूनच गोल्डीने शाहरुखला सिद्धूच्या हत्येच्या कटात सहभागी केले होते.