घरCORONA UPDATEदुसरा डोस आणि booster dose मधील अंतर 6 महिने करावे; अदर पूनावालांचे...

दुसरा डोस आणि booster dose मधील अंतर 6 महिने करावे; अदर पूनावालांचे केंद्राला आवाहन

Subscribe

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं आहे. या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात भारतात कोरोनाची प्रकरणे नगण्य असली तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला या गोष्टी अजिबात हलक्यात घ्यायच्या नाहीत. यामुळे केंद्र सरकारे 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना बूस्टर डोस मिळणार असल्याचे जाहीर केले. . केंद्राच्या अधिकृत निवेदनानुसार, 18 वर्षांवरील लोक ज्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत असे लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र असतील. मात्र यामुळे लसीकरण मोहिमेची गती मंद होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दुसरा डोस आणि बुस्टर डोस (booster dose) मधील अंतर 6 महिने करावे असे आवाहन सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केले आहे.

अदर पूनावाला म्हणाले की, सध्या लसीकरण मोहिमेची गती मंद होत आहे. कारण केंद्राचा असा नियम समोर आला आहे की, नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोस घेण्यासाठी 9 महिने प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे हे अंतर 6 महिन्यांपर्यंत कमी करावे असे आवाहन केंद्र सरकारला करत आहोत. त्यामुळे केंद्र सरकार 6 महिन्यांचे अंतर प्रस्तावित करेल. असं देखील ते म्हणाले. परंतु केंद्र सरकारला यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असेल.

- Advertisement -

सध्या देशात कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क कोविड बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आला आहे. कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा डोस आता 225 रुपयांना उपलब्ध होत आहे. यामुळे आरोग कर्मचारी, 60 वर्षांवरील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच सरकारी आणि मनपा केंद्रांवर बूस्टर डोस मिळणार आहे. तर 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनाही सरकारी केंद्रांवर विनामूल्य लस मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाले तरी नागरिकांनी लसीकरण करणं महत्त्वाचे आहे. त्यात कोरोनाची चौथी लाट टाळण्यासाठी बूस्टर डोस महत्त्वाचा ठरणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -